मंगळ गोचरामुळे कर्क राशीत तयार होणार नीचभंग राजयोग, या राशींचं नशीब चमकणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वपूर्ण ठरते. कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित आहे इथपासून कशी नजर आहे, यावर सगळं अवलंबून असतं. आता मंगळ गोचरानंतर अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

मंगळ गोचरामुळे कर्क राशीत तयार होणार नीचभंग राजयोग, या राशींचं नशीब चमकणार
मंगळ गोचर आणि नीचभंग राजयोगाची स्थिती, या राशींना येणार 'अच्छे दिन'
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 2:50 PM

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. अर्थात त्याची फळं जातकाला भोगावी लागतात. ग्रहांच्या गोचराचा शुभ अशुभ परिणाम होत असतो. काही तासांनी मंगळ ग्रह गोचर करणार आहे. 10 मे 2023 रोजी मंगळ ग्रह दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ही मंगळाची नीच रास मानली जाते. तसं पाहिलं तर कोणताही ग्रह नीच राशीत अशुभ फळं देतो. पण मंगळ गोचरामुळे नीचभंग राजयोग तयार होत आहे.

मंगळ गोचर आणि नीचभंग राजयोगामुले तीन राशीच्या जातकांना धन लाभ आणि नशिबाची साथ मिळणार आहे. हा योग रंकाला राजा बनवण्याची ताकद ठेवतो. जर ग्रह नीच राशीत असेल आमि राशी स्वामी लग्न किंवा चंद्रच्या केंद्र स्थानात असेल तर नीचभंग राजयोग तयार होतो. चला जाणून घेऊया या राशीचा कोणत्या जातकांना फायदा होईल

या तीन राशींना होईल फायदा

मिथुन : मंगळ ग्रह या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धनस्थानात गोचर करत आहे. त्यात नीचभंग राजयोगामुळे नशीब चांगलंच चमकेल. या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. तसेच तुमचं बोलणं एकदम बदललेलं असेल. त्यामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. तसेच काही अडचणी दूर होतील.

कर्क : या राशीच्या लोकांना नीचभंग राजयोग फलदायी ठरेल. कारण नीचभंग राजयोग या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तसेच आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. पण शनि अडीचकीमुळे सावध राहणं गरजेचं आहे.

तूळ : मंगळ ग्रह या राशीच्या कर्मभावात गोचर करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग या राशीसाठी फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात यश मिळताना दिसेल. नोकरी करणाऱ्या जातकांना इंक्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकतं. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.