मंगळ आणि गुरुच्या स्थितीमुळे नवपंचम योग, चार राशींच्या नशिबाची दारं उघडणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्वाची असते. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे, यावरून भाकीत वर्तवलं जातं. सध्या गुरु ग्रह मेष राशीत आहे. तर मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्याने नवपंचम योग तयार झाला आहे.

मंगळ आणि गुरुच्या स्थितीमुळे नवपंचम योग, चार राशींच्या नशिबाची दारं उघडणार
मंगळ गोचर
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:36 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुभ आणि पाप ग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. सूर्य, चंद्र, बुध, गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह आहेत. तर मंगळ, शनि आणि राहु-केतु पापग्रह आहेत. त्यात काही ग्रहांचं एकमेकांसोबत पटतं तर काहींचं पटत नाही. त्यामुळे त्याचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मंगळ ग्रह 18 ऑगस्ट 2023 ला दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत राहणार आहे. तर गुरु ग्रह वर्षभरासाठी मेष राशीत स्थित आहे. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे नवपंचम योग तयार झाला आहे. हा योग गुरु आमि मंगळ या ग्रहांच्या स्थितीमुळे तयार झाला आहे. यामुळे चार राशीच्या जातकांना धनलाभ प्रगतीची दारं खुली होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

या राशीच्या जातकांना होईल फायदा

मेष : या राशीच्या जातकांना गुरु मंगळ स्थितीमुळे निर्माण झालेल्या नवपंचम योगाचा फायदा होईल. यामुळे जातकांच्या मानसन्मानात वाढ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच चांगल्या लोकांशी भेटीगाठी होतील. त्यामुळे कामं झटपट पूर्ण होतील.

कर्क : मंगळ या राशीच्या धन स्थानात विराजमान आहेत. तसेच गुरु ग्रह कारक स्थानाकडे दृष्टी ठेवून आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच केलेल्या कामाचा चांगला मोबदला या काळात मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह : या राशीतच मंगळ ग्रह स्थित आहे. भाग्य स्थानातून गुरु ग्रह मंगळाकडे पाहात आहे. त्यामुळे या नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आई वडिलांकडून मोठी मदत होईल. एखादा व्यवसाय या काळात बसवू शकता. विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल अशी स्थिती आहे. शिक्षणासाठी विदेशवारी घडण्याची शक्यता आहे.

तूळ : या राशीच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून नवपंचम योग लाभदायी आहे. गोचर कुंडली धन भावाचा स्वामी मंगळ लाभ स्थानात विराजमान आहे. यामुळे या काळात उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर जोडीदाराच्या साथीमुळे धनप्राप्ती होऊ शकते. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. या काळात लग्न ठरू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.