सूर्यामुळे कर्क राशीत होणार उलथापालथ, 16 जुलैपासून एक महिन्यापर्यंत तीन राशींचं नशिब चमकणार

सूर्य प्रत्येक महिन्याला राशी बदल करतो. या राशी बदलाला संक्रांती संबोधलं जातं. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण चार राशींना जबरदस्त फायदा होईल.

सूर्यामुळे कर्क राशीत होणार उलथापालथ, 16 जुलैपासून एक महिन्यापर्यंत तीन राशींचं नशिब चमकणार
सूर्याच्या स्थितीमुळे कर्क राशीत आतापासून हालचाली सुरु, तीन राशींना महिनाभर मिळणार साथ
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 10:15 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजाचा दर्जा दिला असून आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. सूर्य एका राशीत महिनाभर राहतो आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या मार्गक्रमणाला ज्योतिषशास्त्रात संक्रांती संबोधलं जातं. सूर्य ग्रह सध्या मिथुन राशीत असून 16 जुलै 2023 रोजी सकाळी 4 वाजून 59 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्यदेव 17 ऑगस्ट 2023 च्या दुपारी 1 वाजून 27 मिनिटांपर्यं राहील. सूर्य ग्रह चंद्रापासून तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थाना असेल तर सकारात्मक परिणाम दिसून येतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र असून सूर्यसोबत मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे सूर्याचं कर्क राशीतील गोचर काही राशींना फलदायी ठरणार आहे.

या राशींना मिळणार सूर्याचं पाठबळ

मेष : या राशीवर मंगळाचं वर्चस्व आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे जातकांना चांगली फळं मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकाची चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. खासगी नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. हाती मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होताना दिसेल. तसेच आत्मविश्वास दुणावलेला राहील. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना या गोचराचा लाभ मिळेल.

कर्क : सूर्यदेव या राशीच्या गोचर करणार असल्याने त्याचा अनपेक्षित लाभ मिळेल. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. विवाह करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या काळात दूर होतील. व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ आहे. हातात पैसा खेळता राहील. वैवाहिक जीवनात काही वाद झाले असतील तर ते दूर होतील.

तूळ : या राशीच्या एकादश भावाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे जातकांना करिअरमध्ये लाभ होताना दिसेल. वेतन वाढ होण्याची शक्यता आहे. सूर्य देव ग्रहांचा राजा असल्याने राजासारखं जीवन या महिनाभरात अनुभवायला मिळेल. नेतृत्वगुण दिसून येईल. तसेच तुमचं मार्गदर्शन मोलाचं ठरू शकते . नवीन वाहन किंवा घर खरेदीचा योग आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या काळात मिळू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.