शुक्राच्या गोचरामुळे 7 ऑगस्टपासून तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, पाच राशींसाठी ‘अच्छे दिन’

ऑगस्ट महिना सुरु झाला असून ग्रहांची स्थिती आता टप्प्याटप्प्याने बदलत आहे. 7 ऑगस्टला शुक्र कर्क राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

शुक्राच्या गोचरामुळे 7 ऑगस्टपासून तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, पाच राशींसाठी 'अच्छे दिन'
शुक्राने गोचर करताच तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, पाच राशींना मिळणार फायदा
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 6:59 PM

मुंबई : भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 ऑगस्टला राशी परिवर्तन करणार आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी प्रेवश करेल. विशेष म्हणजेच वक्री अवस्थेतच शुक्र कर्क राशीत येणार आहे. या काळात शुक्र अस्तावस्थेत असणार आहे. 19 ऑगस्टला सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी शुक्रोदय होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत शुक्र या राशीत ठाण मांडून बेसले. त्यानंतर 2 ऑक्टोबरला रात्री 1 वाजून 18 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र कर्क राशीत जवळपास 57 दिवस राहणार आहे. शुक्राची स्थिती अशी असताना लक्ष्मीची कृपाही राहील. कर्क राशीत शुक्र शुभ स्थितीत असेल तर मेष राशीतील गुरुची दृष्टी कर्क राशीवर असेल. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. पाच राशीच्या जातकांना याचा लाभ मिळेल.

या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

कर्क : या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. काही गोष्टींवर पैसा खर्च होईल. पण तो योग्य कारणासाठी असेल हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात फलदायी ठरेल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. कुलदेवी आणि कुलदैवताचं दर्शन घ्याल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

मिथुन : गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक अडचण दूर होईल. या कालावधीत पैशांची बचत करण्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढल्याने बोलण्याची शैली बदलून जाईल. तुमच्या वाणीचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल.

कन्या : तुम्ही आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. काही योजनाही यशस्वीरित्या पार पाडाल. त्यामुळे वरिष्ठांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. मुलांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल.

तूळ : कामाच्या ठिकाणचा ताण दूर झाल्याने एकदम शांत वाटेल. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. इतरांसोबत संबंध चांगले राहतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. भौतिक सुखांची अनुभूती या काळात घेता येईल.

मकर : केलेल्या परिश्रमाचं योग्य फळ तुम्हाला या काळात मिळेल. अडकलेला पैसा मिळाल्याने अडचण दूर होईल. मुलांसोबत चांगले क्षण व्यतीत कराल. उगाच वाद होईल असं वागू नका. सामंजस्यपणे घ्या आणि मार्ग काढा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.