‘या’ पाच राशींचे जोडीदार असतात विश्वासघाती; वेळ आल्यावर दाखवितात खरा चेहरा!
प्रेम आणि लग्न (Love and marriage) हा आयुष्यातला सुंदर आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य आणि प्रामाणिक जोडीदाराची (partner) साथ आयुष्यात प्रगती आणि सुख देते. आयुष्याला अर्थ लाभतो. याविरुद्ध जर जोडीदार विश्वासघातकी असेल तर आयुष्याची संपूर्ण घडीच विस्कटून जाते. जाणून घेऊया अशा कोणत्या पाच राशी आहेत ज्या विश्वासघात (treacherous) करण्याची शक्यता असते. मेष : ज्योतिष […]
प्रेम आणि लग्न (Love and marriage) हा आयुष्यातला सुंदर आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य आणि प्रामाणिक जोडीदाराची (partner) साथ आयुष्यात प्रगती आणि सुख देते. आयुष्याला अर्थ लाभतो. याविरुद्ध जर जोडीदार विश्वासघातकी असेल तर आयुष्याची संपूर्ण घडीच विस्कटून जाते. जाणून घेऊया अशा कोणत्या पाच राशी आहेत ज्या विश्वासघात (treacherous) करण्याची शक्यता असते.
- मेष : ज्योतिष शास्त्रानुसार तुमचा पार्टनर मेष राशीचा असेल तर त्याला कोणत्याही कामासाठी रोखू नका. या राशीच्या लोकांना टोकलेलं अजिबात आवडत नाही. टोकल्यामुळे त्यांच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल तिरस्कार निर्माण होतो. यामुळे ते आपल्या जोडीदारासोबत विश्वासघात करण्याची शक्यता असते.
- वृषभ : या राशीचे लोक सकारात्मक आणि ऊर्जावान असतात. या राशीचे लोक आकर्षक असतात. या लोकांना नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. त्याच त्याच गोष्टींमुळे या राशीचे लोक बोर होतात. असे लोक रिलेशनशिपमध्ये देखील लवकर कंटाळतात. पार्टनरला विसरायला हे लोक कमी करत नाहीत.
- मिथुन: या राशीचे लोक दिलेली कमिटमेंट मोडतात. या राशीचे लोक धोका देण्यात माहिर असतात. या राशीचे लोक फ्लर्ट करण्यात उस्ताद असतात. जास्त वेळ रिलेशनमध्ये राहाणं पसंत करत नाहीत.
- धनु: या लोकांना रोचक कामं करण्यात जास्त आवड असते. या लोकांना रोखलं किंवा जाब विचारला तर आवडत नाही. या राशीचे लोक दुसऱ्यांचं मन मोडण्यात माहिर असतात.
- सिंह: या राशीच्या लोकांच्या प्रेमात पडण्याची चूक करू नका. त्यांना स्वत:पेक्षा जास्त दुसरं काही प्रिय नसतं. त्यामुळे वेळीच सावध राहा.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)