अशा चार सवई ज्यामुळे कधीच टिकणार नाही तुमच्या हातात पैसा, वेळीच व्हा सावध!
माणसाला अनेक सवई असतात काही चांगल्या सवई असतात तर काही वाईट. आज आपण अशा सवईंबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कायम आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

असं म्हणतात कष्टाला पर्याय नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढे कष्ट कराल तेवढं अधिक चांगलं फळ तुम्हाला मिळेल, तुमच्या आयुष्याची भरभराट होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याचा परिणाम हा शुन्य होतो. तुमच्या हातात पैसा टिकत नाही. तुम्हाला पुन्हा -पुन्हा नव्यान सुरुवात करावी लागते. तुमचं आयुष्य अस्थित बनतं. मात्र तुम्ही जर या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या तर तुमचं आयुष्य पुन्हा एकदा स्थिर होऊ शकतं. चार पैसे तुमच्या हातात राहू शकतात. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या सवईंमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
चाणक्य नीतीमध्ये या गोष्टी विस्ताराने सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला या चार सवई असतील तर त्याच्या हातात कधीही पैसा टिकणार नाही. या चार सवई व्यक्तीला कंगाल बनवतात. त्याला त्याच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना कारवा लागू शकतो.
आर्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने कधीही त्याच्या गरजेपेक्षा अधिक पैसा खर्च केला नाही पाहिजे. जर तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या गरजेपेक्षा अधिक पैसा खर्च करता तेव्हा हळूहळू तुमच्या जवळचे पैसे संपतात. मात्र तुमची सवय जात नाही, त्यामुळे तुम्ही कर्जबाजारी देखील होऊ शकतात.
दुसरीकडे आर्य चाणक्य असं देखील सांगतात की व्यक्तीने आपल्या गरजेपेक्षा जास्त धन खर्च केलं नाही पाहिजे मात्र काही गोष्टीमध्ये त्यांनी स्वत:हून पुढे आलं पाहिजे, एखाद्या गरिबाला दान दिलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. यामुळे त्याच्या घराची भरभराट होते.
व्यसन – आर्य चाणक्य म्हणतात जर एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याचं घर कुटुंब कधीच प्रगती करू शकत नाही. त्यामुळे नेहमी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे.
आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा मणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे तुमची काम करण्याची प्रेरणा कमी होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)