Horoscope : 17 सप्टेंबरपासून तीन राशींचं नशिब फळफळणार, सूर्य आणि शनिचा अशुभ प्रभाव संपणार

Shani Surya Yog : ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि सूर्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने अशुभ योग निर्माण झाला आहे. पण हा योग 17 सप्टेंबरपासून संपुष्टात येणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.

Horoscope : 17 सप्टेंबरपासून तीन राशींचं नशिब फळफळणार, सूर्य आणि शनिचा अशुभ प्रभाव संपणार
Astrology : दोन दिवसानंतर सूर्य आणि शनिची अशुभ छाया तीन राशींवरून होणार दूर, कोणत्या राशी त्या जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 5:05 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव सध्या स्वत:च्या सिंह राशीत आहे. तर शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे या दोघांची दृष्टी एकमेकांवर पडत आहे. सूर्य-शनि पितापूत्र असून त्यांच्या पटत नाही. त्यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर उभे ठाकल्याने त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येत आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र 17 सप्टेंबर 2023 पासून ही स्थिती बदलणार आहे. कारण हा अशुभ योग संपुष्टात येणार असून सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर शनिदेव कुंभ राशीतच असणार आहेत.त्यामुळे तीन राशीच्या जातकांना दिलासा मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या जातकांना लाभ मिळणार ते..

तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार

मेष : सूर्य आणि शनिचा अशुभ योग या राशीच्या जातकांवरून दूर होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येत असलेला अडचणी दूर होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. वाद होईल असं वागू नका आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.

मिथुन : आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरुच ठेवा. व्यवसायातील कामं पूर्ण होतील. तसेच आर्थिक आवक सुरु होईल. कामगारांकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. योग्य वेळी पुरवठा केल्याने आर्थिक कोंडी सुटेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. पत्नीसोबत असलेला वाद संपुष्टात येईल.

तूळ : या राशीच्या जातकांचं एखादं स्वप्न या कालावधीत पूर्ण होईल. भौतिक सुखांची अनुभूती मिळेल. वाहन, संपत्ती किंवा घर खरेदी करू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा होईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. त्यातून भविष्यात फायदा होईल. लॉटरी किंवा शेअर बाजारातून फायदा होऊ शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून उपाय योजना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.