Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग हुकणार! कशी आहे स्थिती? कितवा गुरु? जाणून घ्या

Guru Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे गुरु ग्रहाचं गोचर. देव गुरु बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कशी असेल स्थिती जाणून घ्या.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग हुकणार! कशी आहे स्थिती? कितवा गुरु? जाणून घ्या
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया आणि गजकेसरी योगाचं समीकरण नाहीच, तुमच्या राशीला कितवा गुरु? समजून घ्या
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 2:04 PM

मुंबई : अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त आहे. या दिवशीच देव गुरु बृहस्पती राशी बदल करणार आहे. गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीच पंचग्रही योग तयार होणार आहे. गुरु, सूर्य, बुध, राहु आणि यूरेनस ग्रह एकत्रितपणे मेष राशीत असणार आहेत. पण गजकेसरी योग अवघ्या काही तासांमुळे हुकणार आहे. दुसरीकडे गुरु ग्रह अस्त अवस्थेतच मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 27 एप्रिल 2023 रोजी उदीत होणार आहे.

22 एप्रिल 2023 रोजी गुरु ग्रह सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरु ग्रह 1 मे 2024 पर्यंत राहणार आहे. तर 22 एप्रिल 2023 रोजी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी चंद्र या राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल. 1 तास 10 मिनिटांच्या फरकामुळे गजकेसरी योग हुकणार आहे.

तुमच्या राशीला कितवा गुरु

  • मेष – पहिला गुरु
  • वृषभ – बारावा गुरु
  • मिथुन – अकरावा गुरु
  • कर्क – दहावा गुरु
  • सिंह – नववा गुरु
  • कन्या – आठवा गुरु
  • तूळ – सातवा गुरु
  • वृश्चिक – सहावा गुरु
  • धनु – पाचवा गुरु
  • मकर – चौथा गुरु
  • कुंभ – तिसरा गुरु
  • मीन- दुसरा गुरु

या तीन राशींना होणार फायदा

मिथुन : या राशीच्या एकादश भावात गुरु ग्रह गोचर करत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचं स्थान म्हंटलं गेलं आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक आणि शारिरीक दृष्टीकोनातून तुम्हाला चांगलं परिणाम दिसतील. गुर गोचर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करेल.

मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात गुरुचं गोचर होत आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थानाला भौतिक आणि आईचं स्थान मानलं गेलं आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल.

तूळ : देवगुरू बृहस्पतीचा गोचर तूळ राशीच्या जातकांसाठी अनुकूल राहील. या स्थानाला भागीदारीचं स्थान म्हंटलं गेलं आहे. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहीत. या दरम्यान केलेली गुंतवणून फायेदशीर ठरेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.