Gemstone Benefits: पांढरे प्रवाळ धारण करण्याचे आहेत अनेक फायदे , केव्हा आणि कसे परिधान करावे?
पांढऱ्या प्रवाळाला (White coral) इंग्रजीत कोरल आणि हिंदीत मुंगा म्हणतात. या रत्नाला शास्त्रात महत्त्वाचे रत्न मानले जाते. असे मानले जाते की, पांढरे प्रवाळ ग्रहांचे हानिकारक प्रभाव कमी करते.
Gemstone Benefits Marathi: रत्नांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. यामुळेच अनेक लोक सुख, समृद्धी आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रत्न धारण करतात. रत्न शास्त्रामध्ये (Ratna Shastra) अशा अनेक रत्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे, जे परिधान केल्याने व्यक्तीचा त्रास तर कमी होतोच पण नशीबही चमकू शकते. आज आपण पांढऱ्या प्रवाळबद्दल जाणून घेणार आहोत. पांढऱ्या प्रवाळाला (White coral) इंग्रजीत कोरल आणि हिंदीत मुंगा म्हणतात. या रत्नाला शास्त्रात महत्त्वाचे रत्न मानले जाते. असे मानले जाते की, पांढरे प्रवाळ ग्रहांचे हानिकारक प्रभाव कमी करते. याशिवाय हे धारण केल्याने अनेक जुनाट आजारांपासूनही सुटका मिळते. पांढरे प्रवाळ परिधान करण्याचे काय फायदे आहेत, ते कोणी घालावे आणि ते घालण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.
पांढरे प्रवाळ परिधान करण्याचे फायदे
रत्न शास्त्रानुसार पांढरे प्रवाळ मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. अशा परिस्थितीत जे लोक काही मानसिक अस्वस्थतेतून जात असतील त्यांनी पांढरे प्रवाळ धारण करावे. याशिवाय जर पती-पत्नीच्या नात्यात कटुता असेल तर पती-पत्नी दोघांनीही पांढरे प्रवाळ धारण करावे. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम वाढेल आणि परस्पर संबंधही दृढ होतील.
पांढरे प्रवाळ कोणी घालावे?
ज्योतिषशास्त्रानुसार प्रवाळ रत्न मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर स्थितीत आहे, त्यांनी पांढरे प्रवाळ रत्न धारण करावे. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पांढरे प्रवाळ परिधान करणे फायदेशीर ठरू शकते.
कसे धारण करावे?
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी सकाळी उठल्यावर स्नान करून एका भांड्यात प्रवाळ रत्न टाकून ते गंगाजलात ठेवावे. यानंतर ‘ओम अंगारकाय नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करताना ते धारण करावे.
कोणत्या धातूत घालावे?
ज्योतिषशास्त्रानुसार चांदीच्या धातूमध्ये पांढरे प्रवाळ धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चांदी व्यतिरिक्त, तुम्ही सोने आणि पंचधातूमध्ये देखील परिधान करू शकता.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)