Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Women’s Day 2022 | तुमच्या आयुष्यातील खास स्त्रीला द्या तिच्या राशींप्रमाणे भन्नाट गिफ्ट

माणसाच्या रास त्याच्या स्वभावाबद्द्ल खूप काही सांगून जाते.आज जागतिक महिला दिन (Internatinal Women's Day 2022) तुमच्या आयुष्यातील खूप खास महिलेला या दिवशी तिच्या राशी प्रमाणे गिफ्ट द्या.

Happy Women's Day 2022 | तुमच्या आयुष्यातील खास स्त्रीला द्या तिच्या राशींप्रमाणे भन्नाट गिफ्ट
zodiac
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:11 PM

मुंबई :  प्रत्येक माणूस वेगळा आहे. माणसाच्या रास त्याच्या स्वभावाबद्द्ल खूप काही सांगून जाते.आज जागतिक महिला दिन (Internatinal Women’s Day 2022) तुमच्या आयुष्यातील खूप खास महिलेला या दिवशी तिच्या राशी प्रमाणे गिफ्ट द्या. दरवर्षी ८ मार्च रोजी विविध क्षेत्रातील महिलांच्या गौरवाचे स्मरण म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता, हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचार इत्यादींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. भारतात हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी महिलांना वेगवेगळ्या गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या जातात. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला तिच्या राशी प्रमाणे गिफ्ट देवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

मेष (मार्च 21-एप्रिल 19) या राशींच्या मुली निडर असतात. त्या सहसा कोणाला घाबरत नाहीत. यामुली खूप आत्मविश्वासू असतात. या राशींच्या मुलींना तुम्ही कॉफी मेकर, GPS स्मार्टवॉच/ स्मार्ट सनग्लासेस , डेस्क सेट या गोष्टी भेट म्हणून देऊ शकता.

वृषभ (एप्रिल २०-मे २०) या राशीचे लोक खूप व्यावहारीक असतात. ते सर्वांशी मिळून मिसळून राहतात. त्यामुळे त्यांचे सर्वांशी पटते. या राशींच्या मुलींना तुम्ही घड्याळ, परफ्यूम, पुस्तक या गोष्टी गिफ्ट करु शकता.

मिथुन (21 मे-20 जून) या राशींच्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येतो. या राशींच्या लोकांना स्टेशनरीच्या गोष्टी फार आवडतात. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना तुम्ही फाउंटन पेन / नोटबुक, मार्गदर्शक भेट म्हणून देऊ शकता.

कर्क (21 जून-22 जुलै) कर्क राशींचे लोक खूप प्रेमळ असतात. या राशींच्या व्यक्तींना स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे या राशींच्या मुलींना तुम्हा चॉकलेट मोड , परिवाराचा फोटो गिफ्ट म्हणून देऊ शकता.

सिंह (23 जुलै-22 ऑगस्ट) सिंह राशीचे लोक खूप सर्जनशील असतात. त्यांच्या कडे प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना स्व:ताची काळजी घेण आवडतं त्यामुळे तुम्ही त्यांना मोत्याचे कानातले/मोत्याचे हार, स्टायलिश सनग्लासेस, परफ्यूम या गोष्टी देऊ शकता.

कन्या (ऑगस्ट 23-सप्टेंबर 22) या राशींच्या व्यक्ती मनमोकळ्या असतात. जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टीकोन खूपच व्यावहारिक असतो. या राशींच्या व्यक्तींना तुम्ही ऑफिस अॅक्सेसरीज भेट देऊ शकता.

तूळ (सप्टेंबर २३-२२ ऑक्टोबर) तुळ राशींचे लोक खूप प्रेमळ असतात. ते खुल्या मनाचे असतात, इतरांसोबत चांगले काम करतात. तुम्ही त्यांना रेशमी ब्लाउज / फ्लफी ब्लँकेट, मॅनिक्युअर, मेकअप किट गिफ्ट करु शकता.

वृश्चिक (ऑक्टोबर 23-नोव्हेंबर 21) वृश्चिक राशींचे लोक त्यांच्या रहस्यमयतेसाठी ओळखले जातात. त्यांना काळे कपडे घालायला आवडतात. त्यांना लेदर जॉकेट, लॅपटॉप बॅग गिफ्ट करु शकता.

धनु (२२ नोव्हेंबर-२१ डिसेंबर) धनु राशीचे लोक उत्तम प्रवासी असतात. त्यांना आरामदायक आणि व्यावहारिक कपडे आवडतात. तुम्ही त्यांना पासपोर्ट केस, कॅमेरा गिफ्ट करु शकता.

मकर (२२ डिसेंबर-१९ जानेवारी) मकर राशींच्या मुली महत्वाकांक्षी आसतात. तुम्ही त्यांनी कॅसिओ वॉच, फॅशनेबल स्कार्फ या गोष्टी गिफ्ट करु शकता.

कुंभ (20 जानेवारी-18 फेब्रुवारी) या राशींच्या लोकांना तंत्रज्ञान आवडते. ते पारंपारिक तर असतातच पण त्यांना इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीही आवडतात. तुम्ही त्यांना लॅपटॉप, फोन भेटवस्तू देऊ शकता –

मीन (फेब्रुवारी 19-मार्च 20) मीन राशींचे लोक स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य देतात त्यांना लक्झरी भेटवस्तू आवडतात. तुम्ही त्यांना कवितेचे पुस्तक गिफ्ट करु शकता.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | ”घर का भेदी लंका ढाए” अशी परिस्थिती निर्माण होईल , आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

Astro Ideas: होळीच्या दिवशी हे उपाय करा, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही!

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.