Gruh Lakshmi Yog : ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे तयार होणार गृहलक्ष्मी योग, तीन राशींची चांदी
Astrology 2023 : ग्रहांची स्थिती बऱ्याच काही घडामोडी घडवून जाते. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. अशीच स्थिती शुक्र, बुध आणि मंगळामुळे तयार होणार आहे. गृहलक्ष्मी योगामुळे तीन राशींचं भलं होणार आहे.
मुंबई : नवग्रह राशीचक्रात एका ठरावीक कालावधीनंतर भ्रमण करत असतात. इतकंच काय तर राशींसोबत नक्षत्र परिवर्तनही होत असतं. त्यामुळे 12 राशींवर परिणाम दिसून येतो. मेष ते मीन पर्यंत प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा आहे. एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. तर राशीचक्रातील काही राशींचं स्वामित्व राहु आणि केतु सोडून इतर ग्रहांकडे आहे. त्यामुळे उच्च आणि नीच रास यावरून फळं मिळतात. आता अशीच काहीशी स्थिती राशीचक्रात तयार होत आहे. यामुळे गृहलक्ष्मी नावाचा शुभ योग तयार होणार आहे. शुक्र, बुध आणि मंगळ हे ग्रह जेव्हा उच्च राशीत विराजमान असतात. तेव्हा गृहलक्ष्मी योग तयार होतो. त्याचबरोबर कुंडलीत नवम स्थानाचा स्वामी केंद्रात असतो तेव्हा योग तयार होतो.
कधी तयार होणार गृहलक्ष्मी योग?
3 ऑक्टोबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. या राशीच्या नवव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. दुसरीकडे, बुध ग्रह स्वरास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुले गृहलक्ष्मी योग तयार होणार आहे. बुध ग्रह 1 ऑक्टोबरला रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल.
तीन राशीच्या जातकांना मिळेल विशेष लाभ
वृषभ : गृहलक्ष्मी योगामुळे या राशीच्या जातकांना पाठबळ मिळेल. समाजात मानसन्मान मिळेल. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. तसेच उच्च पदासाठी गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळताना दिसेल. तसेच नवे आर्थिक स्रोत या कालावधीत खुले होतील. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून अपेक्षित लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल.
सिंह : या राशीच्या जातकांना सकारात्मक बदलाची अनुभूती होईल. उद्योगधंद्यात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. मोठा करार हाती लागू शकतो. तसेच कौटुंबिक वाद दूर होतील. तसेच जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने घरचं टेन्शन दूर होईल. आरोग्यविषयक अडचणींवर तोडगा निघू शकतो. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो.
कुंभ : या राशीच्या जातकांना ग्रहांची उत्तम साथ लाभ मिळेल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. वाहन, संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल. उद्योग धंद्यात यश मिळू शकतं. कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचं उत्तम मार्गदर्शन लाभेल.गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर हलका होईल. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग जुळून येईल. ग्रहांविषयक असलेला विधी पूर्ण करू शकता. कुलस्वामिनी आणि कुलदैवताचं दर्शन घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)