गुढीपाडव्याला ग्रहांचा असा मेळ, दोन चांगल्या योगांसह या राशींची होणार ‘अर्थ’पूर्ण सुरुवात

साडे तीन मुहूर्तांपैकी गुढी पाडवा हा एक मुहूर्त आहे. हा दिवस शुभ कार्य सुरु करण्यासाठी उत्तम मानला जातो. यंदा गुढी पाडव्याला ग्रहांचा अनोखा मेळा पाहायला मिळणार आहे.

गुढीपाडव्याला ग्रहांचा असा मेळ, दोन चांगल्या योगांसह या राशींची होणार 'अर्थ'पूर्ण सुरुवात
मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांची सलामी, दोन योगांमुळे 'या' राशींची होणार आर्थिक भरभराट
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 3:36 PM

मुंबई : चैत्र नवरात्र उत्सव 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या दिवशी गुढीपाडवा असून मराठी नववर्षांची सुरुवात होणार आहे. हिंदू नववर्ष संवत् 2080 सुरु होणार आहे. या दिवशी ग्रहांचा अनोखा मेळ राशीमंडळात पाहायला मिळणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक गुढीपाडवा आणि त्यात ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. नववर्षात दोन राजयोग तयार होणार आहे. बुधादित्य आणि गजकेसरी योगाने नववर्षांची सुरुवात होणार आहे. तसेच मी राशीत पाच ग्रहांचा मेळा बसणार आहे.

चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06:29 ते 07:39 ही वेळ पूजेसाठी शुभ राहील.

मीन राशीत गुरुसोबत सूर्य, बुध, चंद्र आणि नेपच्युन हे ग्रह असणार आहे. या स्थितीची राशीचक्रातील सर्वच राशींवर परिणाम दिसून येईल. पण तीन राशींच्या या स्थितीमुळे आर्थिक फायदा होणार आहे. तीन राशींना धनलाभ आणि त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशींबाबत

धनु – या राशीची नुकतीच साडेसाती संपली आहे. त्यात नव वर्ष या राशीसाठी अनुकूल आहे. कारण दोन योग या राशीच्या गोचर कुंडलीतील चतुर्थ भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात सुख आणि समृद्धीत वाढ होण्याची शक्यता आहे. जमिनीसंदर्भातील व्यवहार निश्चित होईल. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. त्याचबरोबर या स्थितीची नजर दशम स्थानावर आहे. त्यामुळे काही कामात अपेक्षित फळ मिळेल.

सिंह- या राशीच्या जातकांना साडेसाती किंवा अडीचकीचा प्रभाव नाही. त्यात दोन राजयोग या राशीला आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणारे आहेत. जे लोक रिसर्च संदर्भात काम करत आहेत त्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. भागीदारीच्या धंद्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.

मिथुन – या राशीची नुकतीच शनिच्या अडीचकीतून सुटका झाली आहे. त्या या राशीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. दोन्ही राजयोग गोचर कुंडलीतील दशम स्थानात तयार होत आहेत. त्यामुळे जातकांना हा काळ आनंदाचा जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं या काळात इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन होऊ शकतं. वडिलोपार्जित जमिनीतून फायदा होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.