Gudi Padwa 2023 : हिंदू नववर्षाचं राज्य बुध ग्रहाच्या हाती, कसं असेल राजकारण आणि आर्थिक स्थिती जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची मंत्रिमंडळ व्यवस्था असते. ग्रहांचं हे मंत्रिमंडळ वर्षभरासाठी असतं. हे मंत्रिमंडळ नवसंवत्सरसह दरवर्षी बदलतं.
मुंबई : गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. मान्यतेनुसार, ब्रह्मदेवाने चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली होती. वर्ष 2023 मध्ये हिंदू नववर्ष विक्रम संवत 2080, पिंगल संवत्सरचं स्वागत बुधवारी 22 मार्च 2023 रोजी होणार आहे. नवं संवत्सर पिंगल नावाने ओळखलं जाईल. या वर्षाचा राजा बुध आणि मंत्री शुक्र असेल. यावेळी राजा आणि मंत्र्यामुळे स्थिती कठीण होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार मंत्रिमंडळ पूर्ण पृथ्वीतलासाठी असतं. एखादं देश किंवा राज्याशी निगडीत नसतं. त्यामुळे याचा परिणाम सर्वसमावेश असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
या वर्षावर बुधाचं नियंत्रण असणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आणि क्रोध दिसून येईल. यावेळी निसर्गाचं रौद्र रुप दिसून येईल. अतिवृष्टी आणि चक्रीवादळ या सारख्या घटना घडतील. तसेच आगीच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. पशुधनाची हानी होऊ शकते. सरकारवर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात.
या वर्षीचं मंत्रिपद शुक्र ग्रहाकडे असणार आहे. त्यामुळे व्यवस्थेत थोडी गुंतागुंत दिसून येईल. भौतिक सुख सोयींमध्ये ताण सहन करावा लागू शकतो. राज्यामध्ये चोरी, फसवणूक आणि हिंसाचाराच्या घटना फोफावतील. आजारांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण राहिल.
कृषीवर सूर्याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळ रस, दूध आणि फळांच्या उत्पन्नात घट दिसून येईल. या व्यतिरिक्त गहू, ऊस आणि फळ झाडं आणि फुलांची वाढ चांगली वाढ होईल.गुरुच्या प्रभावामुळे यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असेल. तसेच पूर आणि भुस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ होईल. गहू आणि धान्यांची चांगली वाढ होईल.
एप्रिल महिन्यात देवगुरु मेष राशीत गोचर करणार आहे. तर कुंभ राशीत गोचर करणाऱ्या शनिदेवांची तिसरी दृष्टी देवगुरु बृहस्पतींवर पडेल. शनिच्या या प्रभावामुळे गुरु ग्रह त्रस्त होतील. शनिदेवांची नजर जेव्हा गुरु ग्रहावर पडते तेव्हा शेअर बाजारावर पडसाद दिसून येतात. रशिया युक्रेनसह अन्य ठिकाणी युद्धाची शक्यता आहे.
भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ देश आर्थिक दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे तिसऱ्या युद्धाची शक्यता असल्याने जगावर आर्थिक मंदीचं संकट घोंगावेल. आर्थिक मंदीच्या फेऱ्यात जवळपास सर्वच देश येतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)