Guru Gochar: 12 वर्षानंतर गुरु ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींसाठी अच्छे दिन!
Guru Grah Gochar 2023: देवगुरु बृहस्पती तब्बल 12 वर्षानंतर मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बृहस्पती हा ग्रह देवतांचा गुरु असल्याचं मानलं जातं. त्यामुळे गुरु ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींना चांगली फळं मिळतील.
मुंबई- ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशीचक्रात भ्रमण करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठरावीक कालावधी असतो. मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. सर्वात मंद गतीने गोचर करणाऱ्या ग्रहांमध्ये शनि आघाडीवर आहे. पण शुभ ग्रह असलेल्या गुरुची गोचर चालही वर्षभराने होते. म्हणजेच गुरु ग्रह एका राशीत 12 महिन्यांसाठी राहतो. गुरु ग्रह आपल्या स्वभाव गुणधर्मानुसार फळं देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह व्यक्तीचं जीवन प्रगतीपथावर नेतो. कारण बृहस्पतींना देवांचा गुरु मानलं जातं. त्याचबरोबर गुरु ग्रह हा ज्ञान, कर्म आणि संपत्तीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बृहस्पतीचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं जातं. या वर्षात गुरु ग्रह 22 एप्रिल 2023 रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या या राशीपरिवर्तनामुळे गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींना चांगले दिवस अनुभवता येतील.
मेष- या राशीच्या जातकांना चांगली फळं अनुभवायला मिळणार आहे. कारण या राशीतच वर्षभरासाठी गुरु ग्रह ठाण मांडणार आहे. त्यामुळे निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. व्यवसायात वृद्धी होताना दिसून येईल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनातील मतभेद संपतील आणि करिअरमध्ये यश मिळताना दिसेल.जुन्या आजारातून दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
मिथुन- गुरुच्या राशी परिवर्तनामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. या राशीच्या अकराव्या स्थानात गोचर होणार आहे. हे स्थान भाग्याशी निगडीत आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. कठीण कामंही चुटकीसरशी पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. तसेच लग्नासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांचं लग्न ठरू शकतं.
कर्क- या राशीच्या दहाव्या स्थानात गुरु ग्रहाचं गोचर होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचा समाजात मानसन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी चांगलं पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. आर्थिक स्थिती या काळात चांगली राहाणार असून व्यापाऱ्यामध्ये लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य असल्याने त्याचा फायदा होईल.
कन्या- ही रास असलेल्या लोकांना गुरु गोचराचा विशेष लाभ होईल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. त्याचबरोबर कुटुंबाची साथ मिळणार असल्याने ज्या कामात हात टाकाल त्या कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच नव्या कार्यक्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते.
मीन- या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळतील. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांचं कामाच्या ठिकाणी पद वाढू शकते. गुरु गोचरामुळे लग्नसाठी प्रतीक्षेत असलेल्यांना लाभ होईल. जुनाट आजारातून या काळात सुटका होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)