गुरु ग्रह 22 एप्रिल 2023 रोजी अश्विनी नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींचं नशिब उजळणार
Guru Enter In Ashwini Nakshatra : गुरु ग्रहाच्या गोचराकडे ज्योतिषशास्त्राचं बारीक लक्ष लागून असतं. कारण गुरु ग्रह एका राशीत वर्षभरासाठी ठाण मांडतो. दुसरीकडे, गुरु ग्रह नक्षत्र बदलही करणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत...
मुंबई : ज्योतिषशास्त्र प्रत्येक क्षणाला बदलत असतं. कारण ग्रहांचे गोचर, नक्षत्रांची स्थिती, शुभ अशुभ योग, ग्रहांची युती आघाडी असं सर्व बाबींवर ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असलेला गुरु ग्रह राशी बदल करणार आहे. गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या बरोबर गुरु बृहस्पती 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 3 वाजून 33 मिनिटांनी अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. या नक्षत्रात गुरु ग्रह 21 जून 2023 दुपारी 1 वाजून 19 मिनिटांपर्यंत राहील.
गुरु ग्रह सुख, सौभाग्य, यश, वैभव, धन आणि बुद्धी कारक ग्रह आहे. ज्या जातकांच्या कुंडलीत गुरु ग्रह मजबूत स्थितीत असतो त्यांना सुख समृद्धी मिळते. गुरु ग्रह अश्विनी नक्षत्रात असल्याने काही राशींना जबरदस्त फायदा होईर आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना होईल फायदा
या चार राशींना होईल फायदा
मेष : या राशीच्या जातकांना गुरु ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा फायदा होईल. कारण गुरु ग्रह याच राशीत गोचर करणार आहे. दुसरीकडे अश्विनी नक्षत्रामुळे दुहेरी फायदा होईल. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पण केतु नक्षत्रात गुरु असल्याने वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
मिथुन : या राशीच्या एकादश भावात गुरु ग्रह गोचर करणार आहे. यामुळे या लोकांना नोकरी आणि उद्योगक्षेत्रात चांगलं यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील.
धनु : या राशीच्या पाचव्या स्थानात गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात लाभ होईल. त्यामुळे वातावरण आनंदी राहील.
मकर : या राशीच्या चौथ्या स्थानात गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्याचबरोबर गुरुचं अश्विनी नक्षत्रातील प्रवेश लाभदायी ठरेल. नोकरीत प्रमोशन आणि इंक्रिमेंट मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)