Guru Pushyamrut Yog 2023 : येत्या दोन दिवसात गुरुपुष्यामृत योग, जाणून शुभ मुहूर्त आणि महत्त्व

ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्यामृत योग हा सर्वोत्तम योग मानला जातो. हा योग असताना काही शुभं कार्य केली की त्यात यश मिळतं अशी मान्यता आहे. या दिवशी सोनं घेतल्यास ते फळतं असही बोललं जातं.

Guru Pushyamrut Yog 2023 : येत्या दोन दिवसात गुरुपुष्यामृत योग, जाणून शुभ मुहूर्त आणि महत्त्व
गुरू पुष्य योग
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 10:50 AM

मुंबई : पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आली आहे. या दिवशी सुरु केलेल्या कामात चांगलं फळ प्राप्त होतं अशी मान्यता आहे. या नक्षत्रात केलेल्या कार्यात स्थायित्तव भाव असतो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून लवकर बदल होऊ नये अशी कामं या दिवशी केली जातात. दुसरीकडे, देवगुरु बृहस्पतीला ग्रहांमध्ये मंत्री आणि गुरुचं स्थान प्राप्त आहे. गुरुची दृष्टी सर्वात पवित्र मानली गेली आहे. त्यामुळे गुरुवारी पुष्य नक्षत्रात आल्यास गुरुपुष्यामृत योग तयार होतो. यंदा 27 एप्रिल 2023 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे.

गुरुपुष्यामृत योग तिथी आणि मुहूर्त

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 27 नक्षत्रांपैकी 8 व्या स्थानी पुष्य नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र गुरुपुष्यामृत योग 27 एप्रिल 2023 रोजी आहे. सकाळी 7 वाजता गुरु ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. हा योग 28 एप्रिलच्या सूर्योदयापर्यंत असेल.

अशी शुभ कार्य फळतात

  • गुरुपुष्यामृत योगात सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. कारण सोन्याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातू असं मानलं जातं. त्यामुळे या नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
  • या नक्षत्रात वाहन, घर, जमिन आणि वहीखातं खरेदी करणंही शुभ मानलं जातं.
  • या दिवशी घर, मंदिराचं बांधकाम सुरु करणं शुभ मानलं जातं.
  • या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास ती प्रसन्न होते. घरात सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तूपाचा दिवा लावावा.
  • या दिवशी मंत्र जप सुरु केल्यास त्याचं अक्षय पुण्य लाभतं.
  • या नक्षत्रात शिल्प, चित्रकला आणि पुस्तकं खरेदी करणंही शुभ मानलं गेलं आहे.

या दिवशी ही कामं करू नये

  • या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकता. पण नवीन सोनं, ज्वेलरी या दिवशी परिधान करू नका.
  • या दिवशी विवाह करू नये. कारण पुष्य नक्षत्राला ब्रह्म देवाने शाप दिला आहे. त्यामुळे या दिवसात विवाह वर्जित आहे.
  • या नक्षत्राचं स्वामित्व शनिकडे आहे. त्यामुले या दिवशी दारु पिणं, व्याजावर पैसे देणे, खोटं बोलणं आणि स्त्रिचा अपमान करू नये.
  • पुष्य नक्षत्र शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे या दिवशी कोणतंही तामसिक आणि अपवित्र काम करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.