Astro 2023 : गुरु राहुची युती सहा महिने देणार त्रास, 40 दिवसानंतर ‘या’ राशी येणार अडचणीत

ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांच्या युती खुपच अशुभ ठरतात. त्यापैकी एक म्हणजे गुरु आणि राहुची युती. या युतीमुळे गुरु चांडाळ योग तयार होतो आणि जातकाला त्रास होतो.

Astro 2023 : गुरु राहुची युती सहा महिने देणार त्रास, 40 दिवसानंतर 'या' राशी येणार अडचणीत
गुरु चांडाळ योगामुळे तीन राशींच संकट वाढणार, खर्चावर नियंत्रण ठेवा नाही तर...
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 8:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहाचं स्थान आणि युतीचा अभ्यास केला जातो. ग्रहांची पाप आणि शुभ ग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पाप ग्रह आणि शुभ ग्रहांच्या युतीमुळे बऱ्याच घडामोडी घडतात. गोचर कालावधीनुसार गुरु ग्रह 23 एप्रिल 2023 रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच चंद्र आणि राहुची युती असल्याने ग्रहण योग असणार आहे. त्यात गुरु ग्रह राहुच्या संपर्कात येणार असल्याने गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. म्हणजेच मेष राशीत गुरु चांडाळ आणि ग्रहण योग जुळून येणार आहे.

गुरु आणि चंद्राची युती होत असल्याने गजकेसरी योग असेल.मात्र हा अवघ्या काही तासांसाठी असेल. तर गुरु चांडाळ योगाची स्थिती 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे योगाचा मानव तसेच पृथ्वीतलावर विपरीत परिणाम दिसून येईल. त्यामुळे हा योग तयार होताच 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. गुरु चांडाळ योग हा सर्वात त्रासदायक योग म्हणून संबोधला जातो.

देवगुरु बृहस्पती बुद्धी, ज्ञान, धर्म इत्यादींचा स्वामी आहे. दुसरीकडे राहुमुळे व्यक्ती अनैतिक कृत्ये, अवैध कृत्ये, जुगार, नशा, सट्टेबाजीकडे खेचली जाते. जर कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार झाला असेल तर राहू गुरुचा प्रभाव नष्ट करून व्यक्तीला पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणतो.

या राशींवर होईल विपरीत परिणाम

मेष : या राशीच्या लग्न भावात म्हणजेच प्रथम स्थानात 23 एप्रिल 2023 रोजी गुरु चांडाळ योग तयार होणार आहे.त्यामुळे सहा महिन्यांचा कालावधी अडचणीचा असणार आहे. या काळात अचानकपणे दुखाचा डोंगर कोसळले. आर्थिक दृष्ट्या तुमची बाजू खालावेल. समाजात काही कारणास्तव अपमान सहन करावा लागेल. आरोग्यविषयक तक्रारीचा सामना करावा लागेल.

मिथुन : गुरु चांडाळ योगामुळे या राशीच्या जातकांना वाईट बातम्यांचा भडीमार सुरु होईल. एक संकट गेलं की दुसरं संकट उभं राहील. अचानक येणाऱ्या संकटांमुळे मानसिक स्वास्थ्य ढासळेल. कामाच्या ठिकाणीही ताण दिसून येईल. त्यामुळे या काळात जितकं नामस्मरण करता येईल तितकं करा. त्याचबरोबर धार्मिक कार्य आणि पूजा यात वेळ व्यतित करा.

धनु : या राशीच्या पाचव्या स्थानात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. गाडी चालवताना सतर्कता बाळगा. विनाकारण कसेही पैसे खर्च करू नका. तसेच अनावश्यक खर्च टाळा कारण अचानकपणे येणाऱ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.