12 वर्षानंतर शुक्र आणि गुरुची होणार मंगळाच्या मेष राशीत युती, तीन राशींवर होईल अशी कृपा
ग्रहांचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर पडत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिष्यांचं बारीक लक्ष असतं. कोणत्या ग्रहाचा कसा प्रभाव पडतो याचं आकलन केलं जातं. मेष राशीत गुरु आणि शुक्र ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. एका राशीत ठरावीक काळ ठाण मांडल्यानंतर ग्रह राशीबदल करतो. काही ग्रह दीर्घकाळ राशीत बस्तान मांडून बसतात. यात शनि, राहु-केतु आणि गुरु ग्रहाचा समावेश आहे. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठी बराच कालावधी लागतो. सध्या गुरु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. या राशीत पुन्हा येण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागेल. मे 2024 पर्यंत गुरु या राशीत असणार आहे. त्यानंतर वृषभ राशीत गोचर करेल. असं असताना 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुरु आणि शुक्र ग्रह मेष राशीत एकत्र येणार आहेत. शुक्र आणि गुरुच्या युतीचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडेल. तर काही राशींना सांभाळून राहावं लागेल. शुक्र ग्रह मेष राशीत 24 एप्रिल ते 19 मे या कालावधीत राहणार आहे. तर गुरु ग्रह 1 मे रोजी वर्षभरासाठी वृषभ राशीत गोचर करेल. म्हणजेच 8 दिवस ही युती असणार आहे. त्यानंतर 19 मे ते 12 जून दरम्यान वृषभ राशीत युती होईल.
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीतच 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुरु आणि शुक्र एकत्र येत आहेत. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील.कार्यक्रमांमध्ये सत्कार, तसेच समाजात मानसन्मान मिळेल. उद्योगधंद्यात दुपटीने वाढ होईल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी खांद्यावर पडेल. ही जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल असं ग्रहमान आहे.
मिथुन : गुरु शुक्राची युती एकादश भावात होत आहे. त्यामुळे जातकाची आर्थिक स्थिती या कालावधीत मजबूत होईल. करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. प्रेम प्रकरणातही अपेक्षित यश मिळेल. शब्द देताना भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करा.
कर्क : या राशीच्या दशम स्थानात गुरु शुक्राची युती होत आहे. या युतीमुळे व्यवसायात प्रगती दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले व्यवहार पूर्णत्वास येतील. मोठी डील या कालावधीत पूर्ण होऊ शकते. एखादा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हाती बऱ्यापैकी पैसा येईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)