Hanuman Jayanti 2023 : या चार राशींवर हनुमानाची राहते विशेष कृपा, मिळते प्रत्त्येक कामात यश
मंगळवार आणि शनिवार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी विशेष फलदायी आहेत. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड पाठ करणाऱ्यावर हनुमान विशेष आशीर्वाद देतात.
मुंबई : हनुमान सहज प्रसन्न होणारे दैवत असून आजही कलियुगात ते सशरीर अस्तितवात आहे. हनुमानाला भगवान शंकराचे रुद्रावतार मानले जाते. जो भक्त हनुमानाची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. मंगळवार आणि शनिवार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी विशेष फलदायी आहेत. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड पाठ करणाऱ्यावर हनुमान विशेष आशीर्वाद देतात. हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमानजींची जयंती (Hanuman Jayanti 2023) चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या तिथीचे व्रत ठेऊन हनुमानजीची विशेष पूजा केली जाते. जो भक्त नियमितपणे हनुमंताची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून त्वरित मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानजींची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा कायम असते. चला जाणून घेऊया हनुमानाची कोणत्या राशींवर विशेष कृपा असते.
मेष
राशीतील पहिले चिन्ह मेष आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करून चालीसा पाठ केल्यास त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते. या राशीवर हनुमानजींच्या कृपेमुळे संकटांपासून लवकर मुक्ती मिळते आणि प्रत्येक कामात चांगले यश प्राप्त होते.
सिंह
या राशीच्या लोकांवर हनुमंताची कृपा सदैव राहते. सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे आणि सूर्य हा हनुमानजींचा गुरु आहे, अशा स्थितीत हनुमान सिंह राशीच्या लोकांवर विशेष कृपा ठेवतात. या राशीच्या लोकांनी हनुमानजीची पूजा अवश्य करावी. हनुमानाची पूजा केल्याने या राशीच्या लोकांना समाजात चांगला मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते. अशा लोकांवर हनुमानाची कृपा असल्याने ते कोणतेही कठीण काम करण्यास मागे हटत नाहीत.
वृश्चिक
या राशीचा शासक ग्रह मंगळ मानला जातो. वृश्चिक राशीच्या लोकांना हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो, त्यामुळे त्यांना चांगली नोकरी, प्रतिष्ठा आणि व्यवसायात चांगला नफा मिळतो. त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुख, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते. जीवनात चैनीची आणि सुखसोयींची कमतरता नसते.
कुंभ
कुंभ देखील हनुमानजींच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. जो भक्त नियमितपणे हनुमानजीची पूजा करतो त्याला हनुमानासह शनिदेवाची कृपा प्राप्त होते. अशा लोकांचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते. सामाजीक प्रतीष्ठा वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)