Holi 2023 : या सात वस्तू होळीआधी करा घराबाहेर, अन्यथा लक्ष्मी होऊ शकते नाराज

यंदा होळीचा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळी हा एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात.

Holi 2023 : या सात वस्तू होळीआधी करा घराबाहेर, अन्यथा लक्ष्मी होऊ शकते नाराज
होळीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 3:40 PM

मुंबई : होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होलिका दहन (Holi 2023) 7 मार्चला तर रंगांची होळी 8 मार्चला खेळली जाणार आहे. ज्योतिषी सांगतात की, घरात ठेवलेल्या अशुभ वस्तू होळीपूर्वी फेकून द्याव्यात. या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि शुभसंचारात अडथळा येतो. म्हणूनच होळाष्टकच्या काळातच या गोष्टी घरातून काढून टाकण्याची तयारी सुरू करा.

या गोष्टी घराबाहेर काढा

1. सदोष इलेक्ट्रॉनिक्स वस्तू-

अनेकदा घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होतात. त्यांना असे पडून राहणे शुभ नाही. अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातून बाहेर काढणे किंवा दुरुस्त करून घेणे चांगले. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

2. तुटलेली मूर्ती-

तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते. तुमच्या घरातील देवघरात तुटलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर ती ताबडतोब नदीत प्रवाहीत करा.

हे सुद्धा वाचा

3. खराब घड्याळ

अनेकदा लोकं खराब घड्याळ घरात ठेवतात. तुम्हाला माहित आहे का की बंद किंवा खराब घड्याळ माणसावर वाईट वेळ आणू शकते. अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नाही. घरामध्ये एखादे तुटलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब घराबाहेर काढा. थांबलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

4. फाटलेले जुने शूज आणि चप्पल-

होळीपूर्वी घराची साफसफाई करताना तुमचे जुने आणि फाटलेले शूज आणि चप्पल काढायला विसरू नका. फाटलेले जुने शूज आणि चप्पल घरामध्ये नकारात्मकता आणि दुर्दैव आणतात. यामुळे आर्थिक चणचण निर्माण होते.

5. तुटलेला आरसा

तुटलेला आरसा किंवा काचेची कोणतीही वस्तू घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते. त्यामुळे होळीपूर्वी असे कोणतेही सामान घराबाहेर ठेवा. मग तुम्ही अशी कोणतीही वस्तू वापरत असाल तरीही. यामुळे वास्तुदोष जाणवतात आणि मानसिक तणाव व समस्या निर्माण होतात.

6. मुख्य दरवाजा

घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. मुख्य दरवाजासमोर घाण ठेवल्याने अशुभ होते असे म्हणतात. त्यामुळे होळीपूर्वी घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. येथे घाण पसरू नये आणि दारात कोणत्याही प्रकारे झीज होऊ नये हे लक्षात ठेवा.

7. घरातील जाळे-

होळीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण घराची साफसफाई करतो. अशा परिस्थितीत, घरात कुठेही जाळे नाहीत याची खात्री करा. घरातील जाळे गरिबीला प्रोत्साहन देतात. म्हणूनच होळी साफ करताना त्यांना स्वच्छ करायला विसरू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.