Holi 2023: होलिका दहनासाठी फक्त अडीच तासांचा अवधी, जाणून घ्या मुहूर्त आणि नियम

होळीचं दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेची तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाली 4 वाजून 17 मिनिटांपासून सुरु होते आणि 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी संपते. यामुळे होळीका दहन 6 मार्चला केलं जाईल.

Holi 2023: होलिका दहनासाठी फक्त अडीच तासांचा अवधी, जाणून घ्या मुहूर्त आणि नियम
होलिका दहनाचा मुहूर्त चुकवू नका, पंचांगानुसार या वेळेत अग्नि देणं लाभदायी, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 6:58 PM

मुंबई : हिंदू धर्मात होळी हा सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी होळीचं मोठ्या श्रद्धेनं दहन केलं जातं. पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णुंनी नरसिंह अवतार घेतला होता.तसेच हिरण्यकश्यपचा वध केला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा सण साजरा करण्यात येत आहे.यंदा होळी पौर्णिमा 6 मार्च 2023 रोजी आहे. तर धुळीवंदन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7मार्च 2023 रोजी आहे. होळीचं दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेची तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाली 4 वाजून 17 मिनिटांपासून सुरु होते आणि 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी संपते. यामुळे होळीका दहन 6 मार्चला केलं जाईल. होलिका दहन सोमवारी 6 मार्च रोजी केली जाईल. या दिवशी होळी दहनाचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटं ते रात्री 8 वाजून 51 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच होलिका दहनासाठी 2 तास 27 मिनिटांचा अवधी मिळेल.या काळात होलिका दहन करणं सर्वोत्तम राहील.

होळी दहनाचा नियम

होळी दहनाच्या पुजेत काही वस्तू आवश्यक आहेत. यासाठई एका तांब्यात पाणी, शेणी, रोली, अक्षता, अगरबत्ती, फळं, फुलं, मिठाई, हळदी, मुग डाळ, बताशा, गुलाल पावडर, नारळ यांची आवश्यकता असते. होलिका दहनात झाडांची सुकी लाकडं जाळली जातात. यात आंबा, वड आणि पिंपळाची लाकडं जाळू नयेत. कारण या महिन्यात तिन्ही झाडांना पानगळती सुरु झालेली असते. त्यामुळे ही झाडं वर्जित आहेत.

होळी दहन पुजा विधी

होळी दहनापूर्वी विधीवत पुजा करणं आवश्यक आहे. सुर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. दुपारी किंवा सूर्यास्तापूर्वी होळी दहनाच्या ठिकाणी पूजा करण्यास जावं. पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावं. होळीत शेणी टाकाव्यात. त्यानंतर रोळी, अक्षता, फळ, फुलं, माला, हळदी, मुग, गुळ, गुलाल, रंग अर्पण करावं. त्यानंतर होळीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा कराव्यात. त्यानंतर जल अर्पण करून सुख समाधानासाठी प्रार्थना करावी.होळी दहन करताना अग्नित जव किंवा अक्षता जरूर टाकाव्यात.

होळीला ग्रहांची स्थिती

फाल्गुन महिन्यात येणाऱ्या होळी पौर्णिमला चार राशींवर विशेष कृपा असणार आहे. 7 फेब्रुवारीला बुध ग्रहाने मकर राशीत गोचर केलं आहे. त्यानंतर आता 13 फेब्रुवारीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश केला. तसेच 15 फेब्रुवारीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश केला. यामुळे ग्रहांची युती आघाडी आणि स्थानातील स्थितीमुळे चार राशीच्या लोकांना नोकरी- व्यवसाय इतर कामात फायदा होईल. धनु, मिथुन, सिंह आणि मेष राशीच्या जातकांना फायदा होईल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....