Holi Vastu Tips : घरातील नकारात्मकता दुर करण्यासाठी होळीच्या दिवशी करा सोपे वास्तू उपाय
होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. या वास्तु टिप्सद्वारे तुम्ही ग्रह दोषही दूर करू शकता.
मुंबई : होळी (Holi Vastu tips) हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. यंदा होळीचा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळी हा एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. या वास्तु टिप्सद्वारे तुम्ही ग्रह दोषही दूर करू शकता. चला तर मग या आनंदाच्या सणाच्या निमित्ताने घरात सुख, समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात.
वास्तु उपाय
- वास्तुदोषांमुळे पती-पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात. हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरुममध्ये राधा-कृष्णाचे चित्र लावावे. आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करु शकता.
- होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रंगांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा. वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करुन अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर केले जाऊ शकतात. अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशिर्वादाचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.
- होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता. उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल. वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे.
- घर आणि कुटुंबातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, होळीच्या दिवशी तुम्ही घरात झाडे आणि रोपटे लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार रोपं लावूनही घरातील दोष दूर होऊ शकतात. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)