Horoscope 2023 : मित्र ग्रह सूर्य आणि मंगळाची कन्या राशीत होणार भेट, तीन राशींवर पडणार सकारात्मक प्रभाव

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती आघाडी खूप काही प्रभाव टाकते. त्यामुळे कोणत्या ग्रह कोणत्या स्थानात कोणत्या ग्रहासोबत आहेत. हे देखील महत्त्वाचं ठरतं. लवकरच सूर्य आणि मंगळाची युती होणार आहे. त्यामुळे तीन राशींना लाभ होईल.

Horoscope 2023 : मित्र ग्रह सूर्य आणि मंगळाची कन्या राशीत होणार भेट, तीन राशींवर पडणार सकारात्मक प्रभाव
सूर्य आणि मंगळ या दोन्ही मित्र ग्रहांची कन्या राशीत युती, तीन राशींना मिळणार पाठबळ
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 4:23 PM

मुंबई : ग्रहांची स्थिती बदलली की ज्योतिषशास्त्राची गणितं बदलतात. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिष्यांचं बारीक लक्ष लागून असतं. ग्रहांमध्ये सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. तर मंगळ हा शौर्याचं प्रतिक गणला जातो. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही मित्र ग्रह असून कन्या राशीत एकत्र येणार आहेत. ही युती कन्या राशीत सप्टेंबरला होणार आहे. सूर्यदेव 17 सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मंगळ ग्रह ठाण मांडून बसला असून 27 सप्टेंबरपासून अस्ताला जाणार आहे. या स्थितीचा तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. राशीचक्रातील कोणत्या तीन राशी आहेत ते जाणून घेऊयात…

या तीन राशींना मिळणार लाभ

सिंह : सूर्य आणि मंगळाची युती या राशीच्या जातकंना फलदायी ठरेल. कारण या राशीच्या दुसऱ्या स्थानात म्हणजेच धन आणि वाणी स्थानात युती होत आहे. या काळात अकस्मात धनलाभ होऊ शकतो. आत्मविश्वासासोबत ताकद देखील वाढेल. आर्थिक घडामोडींमध्ये जोखिम पत्कारू शकता. पण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरेल. उसनवारीचे पैसे या कालावधीत परत मिळतील. या काळात कोणाला पैसे देणं टाळा. तसेच आपल्या बोलण्याचा इतर लोकांवर प्रभाव दिसून येईल. लोकं प्रभावित होतील आणि कामं झटपट मार्गी लागतील.

मिथुन : या राशीच्या चतुर्थ स्थानात मंगळ आणि सूर्याची युती होणार आहे. त्यामुळे भौतिक सुख अनुभवता येतील. या कालावधीत वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येतील. तसेच कामानिमित्त केलेला प्रवास फलदायी ठरेल. या कालावधीत आईकडून सहकार्य मिळेल. तिच्या संपत्तीतून काही वाटा मिळू शकतो. जर तुमचा व्यवसाय रियल इस्टेटशी निगडीत असेल तर नक्कीच धनलाभ होईल.

धनु : या राशीच्या कर्मस्थानात मंगळ आणि सुर्याची युती होत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रभाव दिसून येईल. तुम्ही आखलेलं प्लानिंग आणि कामाचा धडका यामुळे कंपनीला फायदा होईल. तुमच्या कामाची शैली पाहून पगारवाढ होऊ शकते. नवीन नोकरीचा शोधात असलेल्यांना संधी मिळू शकते. उद्योगपतींना अचानक धनलाभ होईल. या दरम्यान आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.