Horoscope: या पाच राशींची देव घेतोय परीक्षा; करावा लागणार संकटांचा सामना!
संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे पण ते येण्याआधी जर आपल्याला माहिती झाले तर त्यासाठी आपण तयार राहू शकतो, शिवाय त्यावर काही तोडगा काढू शकतो. आज आपण अशाच पाच राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना येणाऱ्या काळात संकटांचा सामना करावा लागणार आहे (God is testing). स्वतः देवच त्यांची परीक्षा घेणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक मात्र […]
संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे पण ते येण्याआधी जर आपल्याला माहिती झाले तर त्यासाठी आपण तयार राहू शकतो, शिवाय त्यावर काही तोडगा काढू शकतो. आज आपण अशाच पाच राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना येणाऱ्या काळात संकटांचा सामना करावा लागणार आहे (God is testing). स्वतः देवच त्यांची परीक्षा घेणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक मात्र नक्की की, जे काही संकट येत आहे त्यानंतर तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस उजाडणार आहे. तुम्ही कष्ट करणे सोडू नका. नवीन योजना बनवत राहा. पैसे जपून वापरा. माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. जोतिष्यशास्त्रानुसार आयुष्यात बरेच बदल होत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात सुख आणि दुखाचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येकाच्या कुंडलीतले ग्रहमान वेगवेगळे असतात, त्याचा जीवनात भिन्न भिन्न प्रभाव पडत असतो.
- वृषभ- अध्यात्मिक बाबींकडे कल वाढेल. अध्यात्मिक प्राप्तीसाठी मोठा योग आहे. याकाळात बोलण्यावर संयम ठेवावे लागेल. हितशत्रू नुकसान करू शकतात तसेच कोणतेही नवीन कार्य आत्ताच सुरू करू नका.
- कर्क– वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. बाहेर जाणे टाळा. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. सार्वजनिक जीवनात आपल्याला सफलता आणि किर्ती मिळेल. व्यापार-व्यवसायात नफा होईल.
- तुळ– अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कामांमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सांभाळा.
- मकर– दिवस प्रसन्न असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तेजीत करणारा दिवस असेल, असे ग्रहमान सांगते. आरोग्याच्या काही कुरबुरी जाणवतील. पैसा जपून वापर. वादविवाद टाळा.
- कुंभ– ग्रहमानानुसार मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाचे कागदपत्रे सांभाळून ठेवा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)