या तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच भाग्यशाली, आयुष्यात प्रचंड पैसा कमावतात, सर्व सुख हात जोडून समोर उभं असतं
हिंदू धर्मामध्ये अंक ज्योतिषाला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार अंक ज्योतिषाच्या मदतीनं व्यक्तीचा स्वाभाव आणि त्याच्या आयुष्याबद्दल खूप काही माहिती मिळू शकते.
हिंदू धर्मामध्ये अंक ज्योतिषाला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार अंक ज्योतिषाच्या मदतीनं व्यक्तीचा स्वाभाव आणि त्याच्या आयुष्याबद्दल खूप काही माहिती मिळू शकते. अंक ज्योतिष शास्त्रात एक अशी तारीख सांगितली आहे. त्या तारखेला ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक खूपच भाग्यशाली असतात, खूप पैसा कमावतात. आज आपण या जन्म तारखेची आणि त्या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या स्वभावाबद्दल जाणून घेणार आहोत.
अंक ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेली ती तारीख 10 आहे, दहा तारखेला ज्यांचा जन्म होतो त्या लोकांकडे ऊर्जा आणि उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. सुरुवातीपासूनच या लोकांना कष्टाची सवय असते. कष्टामुळेच ते आयुष्यात यशाची उंची गाठतात. हे लोक खूप चांगलं आणि आरामदायी आयुष्य जगतात.दहा तारखेला जन्म घेणाऱ्या लोकांचा मूलांक हा 1 असतो. या मूलांकाचे स्वामी सूर्य देव आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य देवांना आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच या तारखेला ज्या लोकांचा जन्म झाला ते अत्यंत स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू असतात.
आरामदायी आयुष्य जगतात
अंक ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांचा जन्म 10 तारखेला होतो त्या लोकांची आर्थिक स्थिती ही खूपच चांगली असते.हे लोक आरामदायी आयुष्य जगतात, कोणालाही हेवा वाटावा असं आयुष्य हे लोक जगतात.त्यांचं वैवाहिक आयुष्य देखील खूपच चांगलं असतं.हे लोक आपल्या बुद्धीचा आणि कष्टाचा वापर करू खूप पैसा कमावतात. या तारखेला जन्मलेले लोक स्वत:वरच नाही तर इतरांवर देखील खूप पैसा खर्च करतात. हे लोक दिखाऊ वृत्तीचे असतात.
दहा तारखेला ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक खूप जिद्दी स्वभावाचे असतात. त्यांना दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, शक्यतो हे लोक नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. हे लोक संकटापासून पळ काढत नाही तर त्याला समूळ नष्ट करण्यावर विश्वास ठेवतात.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)