Horoscope Today 3 August 2023 : ग्रह ताऱ्यांचा खेळ कसा असेल? जाणून घ्या आजचं राशी भविष्य

Horoscope Today 3 August 2023 : आजचा दिवस आपल्या राशीसाठी कसा असेल? आपल्याला ग्रह ताऱ्यांची साथ मिळेल का? हाती घेतलेलं काम पूर्ण होईल का? याबाबतचा अंदाज घ्या

Horoscope Today 3 August 2023 : ग्रह ताऱ्यांचा खेळ कसा असेल? जाणून घ्या आजचं राशी भविष्य
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:02 AM

मुंबई : राशीचक्रात 12 राशी असून नऊ ग्रहांच्या अधिपत्याखाली राशीमंडळ चालत असतं. ग्रहांच्या त्या त्या स्थितीनुसार जातकांना फळ मिळतं. गोचर कुंडतील ग्रहांच्या स्थितीवरून एक सर्वसमावेश अंदाज बांधला जातो. वैयक्तिक कुंडली आणि गोचर कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळे एकाच राशीच्या सर्वांना तशीच फळं मिळतील असं नाही. त्या राशीवर गोचर कुंडलीतील ग्रहांचा कसा प्रभाव आहे यावरून सर्वसमावेशक भाकीत केलं जातं.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष : या राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र राहील. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण संकटाला घाबरून चालणार नाही. धीराने सामना करा. तसेच काही संकटं टळल्याने आनंद वाटेल. वैवाहिक जीवनात चांगले क्षण अनुभवता येतील. पैसे गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

वृषभ : आजच्या दिवसात काही गोष्टी मनासारख्या घडतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना एखादी चांगली संधी मिळेल. पण यासाठी तयारी असणं गरजेचं आहे. होकार देण्यापूर्वी एकदा विचार करा. व्यवसायिकांना आजचा दिवस चांगला जाईल. काही करार निश्चित होतील. संपत्ती खरेदीचा योग आहे.

मिथुन : आजचा दिवस पळापळीचा असेल हे लक्षात ठेवा. पण कामासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचा चांगला परतावा मिळेल. सरकारी कामं पटापट होतील. त्यामुळे हाती घेतलेलं काम सोडू नका. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून कौतुक होईल. व्यवसायिकांना आजचा दिवस डोकेदुखी ठरू शकते.

कर्क : विचार करूनच निर्णय घ्या. आतातायीपणा करू नका. काही निर्णय आयुष्यभराची अद्दल घडवून जातात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. काही कामांनिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. छोट्या पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

सिंह : आजचा दिवस आणि ग्रहांची साथ अनुकूल आहे. दिवसभरता काही ना काही आनंदाची बातमी मिळेल. कौटुंबिक कलह सुद्धा निवळल्याने बरं वाटेल. व्यवसायात काही करार निश्चित होतील. गरज नसताना कोणाकडून पैसे मागू नका. त्यामुळे तुमची छबी खराब होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुमचं आज कौतुक होईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. दिवसभर व्यस्त राहाल. तब्येतीची काळजी घ्या. कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा योग येईल. धार्मिक कार्य हातून घडतील.

तूळ : तुमच्या स्वभावामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहारिकपणे वागा. उगाचच कोणाला शब्द देऊ नका. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. दुसऱ्याचं भलं करण्याच्या नादात बरंच काही गमवून बसाल. बायकोसोबत भांडण होऊ शकतं.

वृश्चिक : आजचा दिवस बरा जाईल. पण काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने चिडचिड होईल. पण अंथरूण पाहूनच पाय पसरवा हे लक्षात ठेवा. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैशांची बचत करा.

धनु : कामाच्या ठिकाणी शत्रूपक्षाकडून त्रास होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. एखाद्या षडयंत्रामुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. बुद्धिचा वापर करा आणि वाद टाळता येईल असं बघा. उगाचच काही कारण नसताना बाजू मांडण्याचा प्रयत्न करू नका.

मकर : आजचा दिवस लाभदायी असेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्राला दिलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. जोखिम असलेलं काम हाती घेऊ नका. उगाचच आर्थिक अडचणीत अडकण्यात काहीच उपयोग नाही. सावधपणे पावलं उचला.

कुंभ : आजचा दिवस सामान्य राहील. काही कामानिमित्त मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रवास करताना काळजी घ्या. शक्यतो लांबचा प्रवास टाळा. तसेच कुटुंबात विनाकारण वाद होईल असं वागू नका. नवीन कामाची सुरुवात होईल. तसेच कुटुंबाची उत्तम साथ मिळेल.

मीन : गेल्या काही दिवसांपासून तब्येतीची चिंता सतावत असेल. त्यावर डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळेल. कुटुंबाशी बोलून योग्ये ते उपचार करा. वाणी आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीच्या मार्गात बाधा येऊ शकते. त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करत राहा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.