आजचे राशी भविष्य 7th September 2024 : चिंता नकोच… आज अविवाहितांना मिळणार खुशखबरी; तुमची रास आहे का ही?

Horoscope Today 7th September 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 7th September 2024 : चिंता नकोच... आज अविवाहितांना मिळणार खुशखबरी; तुमची रास आहे का ही?
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 7:35 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 7th September 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज मनासारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. अविवाहितांना आज खूश खबरी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात वादळ येतील. त्यामुळे चिंता वाढेल. तुमच्या रागावर आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कायदेशीर गोष्टीत विचारपूर्वकच निर्णय घ्या. तरुणांनी करिअरवर अधिक फोकस द्यावा. आज उत्पन्न सामान्यच राहील. ऑफिसात वरिष्ठांशी समन्वय साधून काम करा.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

मालमत्ता किंवा इतर अडकलेल्या कामावर आज मार्ग निघेल. आज तुम्ही अनेक प्रकारच्या कामात व्यस्त असाल. जवळच्या व्यक्तीच्या आगमानामुळे दिवस आनंदात जाईल. कधी कधी तुम्ही चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन चुकीचा निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप होतो. धंदा व्यवसायात सहकाऱ्यासोबत चांगले संबंध ठेवा. कामगारांचं मनोबल वाढवा. असं केल्यास ते मन लावून काम करतील. व्यवसायानिमित्ताने प्रवासाचा योग आहे. वैवाहिक संबंधात एकमेकांचा आदर करा. प्रेम प्रसंगात कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका. आरोग्याच्या समस्या उद्भवतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

कोणत्यारी समस्याचं उत्तर असतं. त्यावर पर्याय असतो. ते उत्तर आज तुम्हाला सापडेल. भविष्यात निर्णय घेण्याची हिंमत तुम्हाला मिळेल. आज मोठी खरेदी कराल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. विचार न करता कुणावरही विश्वास टाकू नका. व्यवसायात अडचणी येतील. पण त्यावर मार्गही निघेल. कर्मचाऱ्यांवर अधिक विसंबून राहू नका. त्यांच्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास टाकू नका. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

तुम्ही ज्या कार्यासाठी प्रयत्नशील आहात. त्यात आज यश मिळेल. धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात तल्लीन व्हाल. भक्तीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. दुपारनंतर जवळच्या व्यक्तीसोबत अबोला होईल. व्यवसायात प्रचंड मेहनत कराल. त्याचा लाभही मिळेल. अधिक धावपळ करू नका. अॅसि़डिटी किंवा गॅसचा त्रास होईल. पोटदुखी वाढेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गावाकडे जाण्याचा योग आहे. घरात नवीन वस्तू खरेदी कराल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्याचा सकारात्मक परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासूनचे रुसवे फुगवे निघून जातील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. अधिक संवेदनशील होऊ नका. अनोळखी लोकांवर विश्वास टाकून संकटांना आमंत्रण देऊ नका. नोकरी आणि व्यवसायात कर्मचाऱ्यांची भरपूर साथ मिळेल. आर्थिक व्यवहारात कुणावरही विश्वास टाकू नका. प्रेमी-प्रेमिकांनी एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. शेतीची कामे मार्गी लावाल. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीने टेन्शन वाढेल. पण त्यातून मार्ग निघेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आज तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. त्यातून एखादी महत्त्वाची योजना बनवाल. आर्थिक बाबतीत थोडी सावधानता बाळगा. आर्थिक गुंतवणूक करणं टाळा. कारण पैसे मिळणं मुश्किल होईल. डबल पैसे देणाऱ्या स्किमपासून दूर राहा. व्यवसायात आज मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. बाप्पाच्या आगमानाबरोबरच तुम्हाला धनलाभही होणार आहे. यापुढे तुमची भरभराट होणार आहे. प्रियकराला अद्दल घडवाल. पोटाचे विकार जाणवतील. त्यामुळे खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

एखादं अडलेलं काम आज पूर्ण होईल. तुमच्या कार्यक्षमतेला वाव देणारा आजचा दिवस आहे. उत्पन्नाबरोबरच खर्चही प्रचंड वाढणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना नवीन ऑफर चालून येईल. गावाला जाणाऱ्यांनी गावाला जायचा बेत रद्द करण्यास हरकत नाही. कोर्टात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. आज मन उदास राहील. त्यामुळे मेडिटेशन करा. थकवा जाणवेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज तुमचे तारे बुलंद असतील. वेळेचा सदूपयोग करा. कोणताही निर्णय घाईत आणि निष्काळजीपणे घेऊ नका. नाही तर नुकसान होईल. त्यामुळे संयम राखा. व्यवसायासंबंधी कोणतेही पेपरवर्क करताना सावधानता बाळगा. पती-पत्नीतील संबंध चांगले राहतील. प्रेयसीसोबत डेटिंगला जाल. आज वाहन खरेदीचा योग आहे. खर्च वाढणार आहे. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. मुलीसाठी अचानक सरप्राईज गिफ्ट द्याल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

कोणत्याही विपरीत परिस्थिती मनोबल चांगलं ठेवा. घर बदलण्याच्या विषयावर चर्चा होईल. आजचा दिवस महिला वर्गासाठी सर्वाधिक चांगला आहे. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना विचार करा. खर्च आणि उत्पन्नाची बाजू पाहूनच धाडसी पाऊल टाका. नाही तर बट्ट्याबोळ होईल. ऑफिसात एखाद्या सहकाऱ्यासोबत वाद होतील. हमरीतुमरीवर प्रकरण जाईल. मालमत्तेची प्रकरणे सामंजस्याने सोडवा. खोकला, सर्दी आणि गळ्यातील इन्फेक्शनचा मोठा त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्या. वातावरण बदलल्याने तब्येतीत बिघाड होईल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. मनपसंत काम वेळेत पूर्ण करा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वर्चस्व वाढेल. आध्यात्मिक क्षेत्राकडे ओढा वाढेल. गावाला नदीपासून दूर राहा. नदीवर जाणं टाळा. कोणत्याही आर्थिक व्यवहारात पडू नका. कुणालाही उधार उसनवारी देऊ नका. पैसे येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. व्यवसायात मजबूत टीम बनवून काम केल्यास त्याचा फायदा होईल. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. थोडं सावध राहा. वातावरण बदलत असल्याने तब्येतीची कूरकूर जाणवू शकते. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक गुंतवणूक करताना घराचा बजेटही पाहून घ्या.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

जवळच्या लोकांच्या संपर्कात राहा. एकमेकांना सहकार्य करा. त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. मनोबल वाढेल. बुजुर्गांचा आशीर्वाद तुम्हाला कायम आहे. गरजवंतांना मदत करा. वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांना मदत करण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे खर्चाला कट मारा. कर्ज काढून जमीन किंवा एखादं वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचा पुनर्विचार करा. ऑफिसमध्ये झोपू नका. नाही तर त्याचा परिणाम उलट होईल. कामात टंगळमंगळ करू नका. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीमुळे घरात गैरसमज निर्माण होतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

खास प्रभावशाली व्यक्तींच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळेल. ही संधी गमावू नका. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. केवळ मनाने निर्णय घेऊ नका. डोक्यानेही निर्णय घ्या. नाही तर अपयश येईल. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मनपसंत ठिकाणी बदली करून मिळेल. वारंवार वर्क फ्रॉम होम घेतल्याने गोत्यात याल. नोकरी सोडल्याचा पश्चात्ताप होईल. दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याचा विचार करणार असाल तर त्याचा पुनर्विचार करा. जवळचा मित्र रागावेल म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका. प्रकृती ठणठणीत राहील. घरी पाहुण्यांचे आगमन होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.