Horoscope Weekly 31 July to 8 August 2023 : साप्ताहिक राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल
Horoscope Weekly 31 July to 8 August 2023 साप्ताहिक राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा हा सप्ताह. या राशीच्या लोकांनी नवे निर्णय घेण्याआधी विचार करावा.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक (Horoscope Weekly 31 July to 8 August 2023 Marathi), मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
साप्ताहिक राशी भविष्य
मेष राशी (Aries) –
या आठवड्यात स्वत:च्या कामा व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या कामत ही रुची राहील. तसंच वेळ मनोरंजनात आणि खुशीत जाईल. घरात शुभ कार्याचे नियोजन होईल. कोणत्याही राजकीय आणि महत्वाच्या व्यक्तींसी भेटी गाठी होतील. ज्या लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांनी मेहनत केल्याने ध्येय गाठता येईल. वित्तीय बाबीत हिशोब करताना कोणत्याही प्रकारची चुक होणार नाही याकडे लक्ष द्या. कुटुंबातील कोणत्यातरी व्यक्तीच्या वागण्याने मनात थोडा त्रास असेल. पण, वादविवाद करत बसण्यापेक्षा शांतपूर्ण पद्धतीने विषय हाताळा. अवघड कामं टाळा. तुमच्या कामाबद्दल कोणाशी ही चर्चा करू नका. आर्थिक दृष्ट्या वेळ चांगला आहे.
वृषभ राशी (Taurus)-
आर्थिक योजनांचे फळ मिळण्यासाठी योग्य वेळ. प्रयत्न करत रहा. प्रतिष्ठित लोकांबरोबर वेळ घालविल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात ही बदल होईल. तसंच आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कामात तुमचं योगदान नक्की द्या. तरूणांनी वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात योग्य समतोल राखणं गरजेचं आहे. यावेळी वायफळ खर्च टाळणं गरजेचं आहे. आर्थिक नुकसान होण्यासारखी परिस्थिती आहे. तुमच्या जवळचीच लोक तुमच्या त्रासाचे कारण ठरू शकतात. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. एखाद्या शंकेच निरसान न झाल्याने चिडचिज होऊ शकते. व्यवसायात काही कठीण प्रसंग असतील. बाहेरच्या लोकांना तुमच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका. तुमचं काहीतरी सिक्रेट सर्वांना समजू शकतं.
मिथुन राशी (Gemini)-
बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कामात सफलता मिळण्याची शक्यता आहे. यावेळी लोकांचा विचार करू नका. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. योग्य यश मिळेल.क तसंत जे लोक तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने असतील. जमीनी संदर्भात कोणतंही अडलेलं काम होण्याची शक्यता. पैश्याच्या व्यवहारात कोणावर विश्वास ठेवू नका. घाईत कोणताही निर्णय घेवू नका. मनात कसली तरी भिती असेल. पण, हा फक्त भास आहे त्याची मनात चिंता ठेवू नका. घरातील मोठ्यांचे सल्ले आणि मार्गदर्शन आमलात आणा. भविष्यात कामाला येईल. व्यवसायात नवीन योजना होतील. उच्च अधिकारी तसंच अनुभवी व्यक्तींचे सहकार्य लाभेल. ज्यांने तुम्हाला तुमच्या कामात मनाप्रमाणे सफलता मिळेल.
कर्क राशी (Cancer)-
तुमचा आत्मविश्वास तसंच कार्य क्षमते द्वारे परिस्थिती चांगली होण्यासाठी प्रयत्न करत राहा. सफलता नक्की मिळेल. घरातील वरिष्ठ लोकांच्या सेवेत लक्ष द्या. काळजी घ्या घरातील वरिष्ठ लोकांची. प्रॉपर्टी संबंधी काही रखडलेली कामं होतील. विद्य़ार्थ्यांना त्याच्या मनाप्रमाणे प्रोजेक्ट मध्ये सफलता न मिळल्याने उदास असतील. पण, पुन्हा प्रयत्न करा आणि तुमचं मनोबळ राखा. नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून योग्य अंतर राखा. नाहीतर तुमच्या मान संन्मानावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. व्यवसायात रिस्क घेवू शकता. काहीतरी नुकसान होण्यासारखी परिस्थिती आहे. चालू कामात लक्ष देणं चांगलं राहील. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग.
सिंह राशी (Leo)-
ही वेळ आत्ममंथन करण्याची आहे. तुम्ही कोणतंतरी नवीन टेक्नीक, कला शिकण्यात यशस्वी ठराल. घरात पाहुण्याच्या आगमनाने वातावरण आनंदी आणि बिझी शेड्युल्ड असेल. महत्वाच्या गोष्टींवर सकारात्मक बोलणं होईल. मुलांकडून कोणत्यातरी शुभ बातमी मिळेल. तुमच्या तत्वांवर आणि सिद्धांतावर जास्त ठाम असणं तुमच्या होत असलेल्या कामात बाधा आणु शकतं. घरातील लहान मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. हस्तक्षेप केल्याने घराची व्यवस्था बिघडू शकते. शांत आणि संयमी स्वभाव ठेवणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. बिझी राहणं गरजेचं आहे. नवीन काम सुरू केले असेल तर त्यात मेहनत असेल. अठवड्याच्या सुरूवातीला धावपळ असेल. पण, मध्यानंतर परिस्थिती अनुकूल असेल. बाहेरच्या कामात तसंच मार्केटिंग संबंधीत कामात लक्ष द्या. चांगले परिणाम मिळतील.
कन्या राशी (Virgo)-
याआठवड्याचे ग्रहगोचर तुमच्यासाठी लाभदायक आहे. वातावरण आनंदी आहे. तुमची योग्यता लोकांसमोर येईलक. त्यामुळे तुमच्या खास कामात लक्ष द्या. आर्थिक स्थिती चांगली असेल. कोणत्यातरी अनोळखी व्यक्तीसोबत भेट लाभदायक ठरेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. जास्त बिझी असल्याने स्वत:साठी वेळ काढणं काठीण आहे. कधी कधी कधी तुमचे मन एखाद्या भितीने विचलित होऊ शकते. कोणत्यातरी अनुभवी व्यक्तीसोबत सल्लामसलत करा. तुमच्या समस्यांचे योग्य समाधान मिळेल. मुलांसोबत वेळ घालावा. कार्यक्षेत्रात सर्वच कामं निर्वघ्न पणे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. पार्टनरशीप संबंधी व्यवसायात कोणत्यातरी गोष्टीवरून मदभेद होवू शकतात. नोकरदार व्यक्तींना आपल्या कामात अधिक सावध राहणं गरजेचं आहे. नाहीतर कोणत्यातरी चुकीमुळे उच्चअधिकाऱ्यांची नाराजी सहन करावी लागू शकते.
तूळ राशी (Libra)-
याआठवड्यात परिश्रम आणि मेहनत जास्त असेल. पण, तुम्ही तुमच्या व्यवहार कौशल्या द्वारे सर्व कामांना योग्य पद्धतीने पार पाडाल. आनंदाची गोष्ट घडेल. सरकारी गोष्टींशी संबंधित समस्येचे निवारण होईलक. प्रभावी व्यक्तिमत्वाची भेट होईल. कौटुंबिक चुका आणि वैचारिक विरोधामुळे तणावाचे वातावरण राहील. शांतपणे समस्यांचे सोडविण्याचा प्रयत्न करा. नाहीतर त्याचा प्रभाव तुमच्या कामावर पडेल. युवावर्ग कामामुळे चिंतेत असु शकतो. अनावश्यक खर्च त्रासदायक ठरेल. कामात योग्य व्यवस्था राखणं गरजेचं आहे. व्यवसायात काही समस्या समोर येतील. पण, वेळेनुसार समस्यांचे निराकरण होईल. स्वत:च्या योग्यतेवर आणि हिमंतीवर विश्वास ठेवा. ऑफिसमध्ये कोणत्यातरी कर्मचाऱ्यामुळे त्रास होऊ शकतो.
वृश्चिक राशी (Scorpio)-
वेळ ज्ञानवर्धक आहे. तुमच्या प्रबळ इच्छा शक्ती आणि आत्मविश्वासाने तुम्ही कोणत्याही कामाला दिशा देऊ शकता. सांसरिक कामं शांततेत संपन्न होतील. त्याच बरोबर आध्यात्मिक कामातील तुमची रूची वाढेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात आणि करिअर संबंधीत गोष्टीत लक्ष देणं गरजेचं आहे. चांगल्या संधी मिळतील. घरातील सदस्यांच्या स्वास्थ्यामुळे चिंता असेल. त्यावेळी त्यांची योग्य काळजी घ्या. राजकीय कामापासून दूर राहा. यावेळी पैसे वाया जाण्या व्यतिरिक्त काहीच साध्य होणार नाही. विनाकराणच्या तर्क वितर्का पासून दूर रहा. काही वेळ एकांतात किंवा मेडिटेशन मध्ये नक्की घालवा.
धनु राशी (Sagittarius)-
आजुबाजूचे वातावरण सुखी असेल. घराची साफ सफाई करण्यात वेळ जाईल. घराल्या बरोबर विचार विमर्श करणं सकारात्मक परिणाम देईल. कोर्ट केस किंवा वादविवाद संबंधी काही सुरू असेल तर तुम्हाला त्यात यश नक्की मिळेल. सहनशील रहा. कोणत्याही विषयावर बोलताना सावधानी बाळगा. वादविवाद होऊ शकतात. कोणतंही काम करताना त्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. अनुभवाची कमी असल्याने कामं बिघडू शकतात. कोर्ट केस संबंधी बाबतीत कोणत्यातरी अनुभवी व्यक्तीसोबत चर्चा करा. इंपोर्ट एक्सपोर्ट संबंधी व्यवसायासाठी वेळ खूप अनुकूल आहे. व्यवसायिक कामात सुरूवातीला त्रास येण्याची शक्यता आहे.
मकर राशी (Capricorn)-
कामं मना प्रमाणे होतील. उत्पन्नाचे स्त्रोत कायम राहतील. भविष्या संबंधी काही योजना तयार होतील. तुमच्या कडून होणारे महत्वपूर्ण काम प्रंशासेस पात्र ठरेल. जनसंपर्क वाढेल. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियात वाढेल. अतिरिक्त काम स्वत: कडे घेऊ नका. त्यामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आर्थिक कामात सकारात्मक परिणाम नाही मिळणार. नवे निर्णय घेण्याआधी विचार करा. व्याह्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. पैश्यावरून वाद-विवाद होऊ शकतात. व्यवसाय वाढण्याच्या योजना होऊ शकतात. नवी मशीनरी तसंच नवी टेक्नीक नव्या प्रयोगा संबंधी विचार होईल. राजकीय कामात सावध राहा. बॉस किंवा अधिकाऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीला घेवून नाराज होऊ नका.
कुंभ राशी (Aquarius)-
घरात मंगल प्रसंग आणि शुभ प्रसंगाचे आयोजन होईल. गेल्या बराच काळापासून चाललेल्या चिंता दूर होतील. तुमच्या सफलतेचे मार्ग मोकळे होतील. वेळेचा सदुपयोग करा. दीर्घकाळीन योजनेवर काम करा. जनसंपर्क वाढवा. मित्रांचे सहकार्य न मिळाल्याने अडलेली कामं देखील पूर्ण होतील. जवळचे लोक कामाच अडथळे व्यत्य आणतील. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमच्या कार्यक्षमतेवर आणि काबिलतेवर विश्वास ठेवा. यावेळी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये ताळमेळ बसवणं कठीण असेल. मुलांची संगत आणि कामावार लक्ष ठेवा. व्यवसायातील कामाचे ताण असेल. पण, ताण घेवू नका. राजकीय क्षेत्रातील लोकांशी व्यवहार करताना सावधानी बाळगा. नाहीतर तुमची कामं रखडू शकतात. प्रॉपर्टी संबंधी व्यवसायात फायदेशीर परिस्थिती राहील.
मीन राशी (Pisces) –
मानसिक सुख- शांति असेल. नवनवीन माहिती मिळविण्यात वेळ जाईलक. महत्वाची कामं वेळेत पूर्ण झाल्याने भारी वाटेल. महिला वर्गासाठी वेळ चांगला आहे. तुमच्या क्षमतेचा पूरेपूर वापर करा. तरूणांना इंटरव्ह्यू मध्ये सफलता मिळेल. आर्थिक बाबतील बजेटवर लक्ष देणं गरजेचं आहे. लोन घेण्याची वेळ येऊ देऊ नका. नकारात्मक प्रवृत्तीचे लोक स्वत:च्या फायद्यासाठी तुमचं नुकसान करू शकतात. लोकाचं ऐकून कोणताही निर्णय घेवू नका. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. ही वेळ व्यवसाया संबंधित तुमच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा आहे. इनकम असेल त्याचसोबत खर्च ही वाढतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)