कर्क राशीला 3 ते 5 मार्चचा कालावधी कसा असेल ? काय सांगतंय चंद्र गोचर, वाचा
चंद्र हा ग्रह मंडळात सर्वात वेगाने गोचर करणार ग्रहांपैकी एक आहे. चंद्राच्या गोचराची फळं अल्पावधीसाठी असली तरी ती परिणामकारक ठरतात. त्यामुळे मानसिक स्थितीचा अंदाज येतो.
मुंबई : प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. पण असं असलं तरी ग्रहांचं त्या राशीतील स्थान महत्त्वाचं ठरतं. राशीमंडळात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. त्याचबरोबर शुक्ल पक्षातील चंद्र आणि कृष्ण पक्षातील चंद्र वेगवेगळी स्थिती निर्माण करतो. त्यामुळे चंद्राचं बळ कसं मिळतंय यावर सर्वकाही अवलंबून असतं. चंद्र गोचराचं फळ हे अल्पावधीचं असतं. मात्र असं असलं तरी कधी कधी या वेळेतच आपली महत्त्वाची काम होतात किंवा रखडतात. त्यामुळे चंद्राचं गोचरही अल्पवधीचं असलं तरी त्याचं महत्त्व अधोरेखित करतं. चंद्र हा माता आणि मनाचा कारक ग्रह आहे.
कर्क ही ज्योतिषशास्त्रातील चौथी रास आहे. 3 मार्चला चंद्र गोचर करत मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क या राशीचं चिन्ह खेकडा असून स्वामी चंद्रच आहे. कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. त्याचप्रमाणे या व्यक्तींची वागणं अगदी खेकड्यासारखं असतं. एकदा एखादी वस्तू पंजात पकजली तर ती सोडत नाही. त्याचप्रमाणए या राशीचे लोक आपले विचार सहजासहजी सोडत नाहीत.
कर्क राशीत सध्या कोणताच ग्रह नसल्याने या दोन दिवसात चंद्राचा अंमल असणार आहे. त्यात शुक्ल पक्षातील वाढत्या कलेचा चंद्र असल्याने फायदा होईल. चंद्राने पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात प्रवेश केल्यास चांगली फळ देतो. बाकी स्थानात चंद्र संमिश्र परिणाम देतो. या काळात काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.
चंद्र गोचर 3 मार्च ते 5 मार्च 2023 (शुक्ल पक्ष)
- कर्क- पहिलं स्थान (सकारात्मक)
- सिंह – बारावं स्थान (संमिश्र परिणाम)
- कन्या– अकरावं स्थान (सकारात्मक)
- तूळ– दहावं स्थान (सकारात्मक)
- वृश्चिक– नववं स्थान (संमिश्र परिणाम)
- धनु – आठवं स्थान (संमिश्र परिणाम)
- मकर– सातवं स्थान (संमिश्र परिणाम)
- कुंभ– सहावं स्थान (सकारात्मक)
- मीन– पाचवं स्थान (संमिश्र परिणाम)
- मेष– चौथं स्थान (संमिश्र परिणाम)
- वृषभ– तिसरं स्थान (सकारात्मक)
- मिथुन- दुसरं स्थान (संमिश्र परिणाम)
चंद्र आणि इतर ग्रहांची युती
चंद्र सूर्य युती – ज्योतिषशास्त्रानुसर चंद्र हा स्त्री ग्रह असून मनाचा कारक ग्रह आहे. सूर्याला आत्म्याचा दर्जा प्राप्त आहे. ही युती शुभ स्थानात असल्यास चांगली फळं मिळतात
चंद्र मंगळ युती – मंगळ हा अग्निकारक ग्रह आहे. मंत्रिमंडळात सेनापतीचं स्थान असून रागाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे चंद्र आणि मंगळाची युती असल्यास माणूस सहासी बनतो. या युतीला ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी योग म्हंटलं जातं.
चंद्र बुध युती – बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे चंद्रासोबत युती झाल्यास जातक अभ्यासात प्रचंड हुशार असतो. यामुळे जातक लेखक, पत्रकार होऊ शकतो.
चंद्र गुरु युती- चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होतो. हा सर्वात चांगला योग म्हणून गणला जातो. असा योग असलेल्या व्यक्तींना पैशांची काहीच कमी नसते.
चंद्र शुक्र युती – या दोन ग्रहांच्या युतीमुळे व्यक्ती सुंदर, कलाप्रेमी होतो. चंद्र शुक्राच्या युतीमुळे व्यक्तीला कन्या रत्न प्राप्त होतं. ही कन्या जातकाचं नाव मोठं करते आणि नावलौकिक मिळवून देते.
चंद्र शनि युती- या दोन ग्रहांमुळे जातकांना विनाकारण भीती सतावत राहते. त्यामुळे जातकाला नाहक त्रासही सहन करावा लागतो.
चंद्र राहु युती – राहु आणि चंद्राचं एकमेकांशी पटत नाही. हे दोन ग्रह एकत्र आले की ग्रहण योग तयार होतो. जातक मानसिकरित्या अस्थिर होतो.
चंद्र केतु युती – या दोन ग्रहांच्या युतीमुळे जातकाची आई कायम आजारी राहाते. त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीमुळे जातकाला त्रासच होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)