India vs Bharat : देशाचं नाव भारत झालं तर ते किती प्रभावी ठरेल? जाणून घ्या ज्योतिष आणि अंकशास्त्रींचं म्हणणं
India vs Bharat : देशाचं नाव भारत असावं कि इंडिया याबाबत गेल्या दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे देशात दोन गट पडले आहेत. असं असताना ज्योतिष आणि अंकशास्त्रींना काय वाटते? ते जाणून घ्या
मुंबई : देशाच्या नाव काय असावं यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. भाजपा विरोधी आघाडीचं नाव इंडिया असल्याने यावरून राजकारणही तापलं आहे. भारत आणि इंडिया दोन नावावरून दोन गटही पडले आहेत. सोशल मीडियावर ही दोन्ही नावं गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये आहेत. आता भारत या नावावरून ज्योतिष, अंकशास्त्री आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञांना काय वाटते? भारत या नावाने देशाचं नशिब उजळणार का? भारत या नावाचा किती प्रभाव पडेल? देश महासत्ता बनण्यात याचा हातभार लागेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
ज्योतिष्यांचं म्हणणं काय आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती, ठिकाण आणि वस्तूचं नाव तसा प्रभाव टाकत असते. नावावर बरं काही अवलंबून असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मावेळी चंद्र ज्या राशीत असतो त्यावरून रास ठरवली जाते. त्या राशीच्या अक्षरांवरून नाव ठेवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार राम या नावाभोवती सकारात्मक उर्जेचा वास असतो. पण रावण नाव घेतलं की नकारात्मकता जाणवते. असंच सीता आणि शूर्पणखा या नावांचं देखील आहे.
भारत या नावाचा उल्लेख भ या अद्याक्षरातून होतो. भरत या नावातून भारत हे नाव तयार झालं आहे. भारत या नावातून भरण पोषण करणं असा अर्थ निघतो. धर्मशास्त्रातही भरत नावाच्या राजाची बरीच स्तुती करण्यात आली आहे. त्याचा कार्यकाळ भरभराटीचा होता असं सांगितलं जातं. तसेच भारत हे नाव लोक कल्याण दर्शवते. दुसरीकडे, धर्मशास्त्रात इंडिया या नावाचं कुठेच अस्तित्व नाही. त्यामुळे भारत हे नाव योग्य ठरेल असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
अंकशास्त्र काय सांगते?
भारत या नावाची गोळाबेरीत 15 येते. पण अंकशास्त्रात 1+5 असं करत 6 हा अंक येतो. 6 या अंकावर शुक्राचा अंमल आहे. शुक्र ग्रह भौतिक सुख, नावलौकिक, मानसन्मान याच्याशी निगडीत आहे. दुसरीकडे 1 आणि 5 अंकांचंही महत्त्व आहे. 1 या अंकावर सूर्याचा अंमल आहे. त्यामुळे नेतृत्व गुणांसह पाच हा अंक स्थिरता दर्शवतो. त्यामुळे अंकशास्त्रातही भारत हे नाव योग्य ठरवलं जात आहे.
वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार भारत ही भूमी देवभूमी आहे. येथे देवांनी स्वयं अवतार घेतला आहे. त्यामुळे धर्मशास्त्राला आधारीत नाव देशासाठी प्रभावी ठरेल. त्यामुळे देशाचं नाव भारत झालं तर ते प्रभावी ठरेल असं वास्तुशास्त्री सांगतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)