तुमच्याही घरात असतील हे 5 फोटो तर लगेच काढून टाका, येऊ शकतं मोठं सकंट, वास्तू शास्त्र काय सांगतं?
घरात फोटो लावताना काळजी घेणं गरजेचं आहे. काही फोटोंमुळे घरामध्ये नकारात्मक शक्तिंचा प्रवेश होतो असं मानलं जातं.
घर बांधताना ते वास्तू शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार बनवले जाते. मात्र जी घरं वास्तू शास्त्रानुसार बांधली जात नाहीत, त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह, पैसा न टिकणं, घरात शांती नसणं अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात असं मानलं जातं. प्रत्येकाचं आपल्या घरावर खूप प्रेम असतं. आपलं घरं आकर्षक दिसावं, सुंदर दिसावं यासाठी घराला सजवलं जातं. घराला सजवत असतानाच रंगरंगोटीसोबतच घरात काही आकर्षक फोटो, पेंटिंग देखील लावण्या येते . मात्र घरात फोटो लावताना काळजी घेणं गरजेचं आहे. काही फोटोंमुळे घरामध्ये नकारात्मक शक्तिंचा प्रवेश होतो असं मानलं जातं. अशाच पाच फोटोंबद्दल आपण आज माहिती घेणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार घरात कधीही नटराजची मूर्ती नसावी. ही मूर्ती महादेवांच्या तांडव मुद्रेच प्रतीक मानलं जातं. तांडव मुद्रा ही विनाश दर्शवते.त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार घरात कधीही नटराजची मूर्ती नसावी.तसेच नटराजची पेंटिग असेल तर ती देखील लावू नये.
अनेकजण आपल्या घरात बुडत्या नावेचं पेटिंग किंवा फोटो लावतात. वास्तू शास्त्रानुसार अशा प्रकारचा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. अशा फोटोंमुळे तुमची इच्छाशक्ती कमजोर होते.त्यामुळे असा भास होतो की घरावर काही तरी मोठं संकट येणार आहे.
घरात कधीही कोणत्याही दरगाह, कब्र यांचा फोटो लावू नका, वास्तू शास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मक शक्तिंचा संचार होतो. कुटुंबातील व्यक्तींच्या मनात एक प्रकारचे नकारात्मक विचार सुरू राहतात.
घरामध्ये कधीही घुबड, गिधाड, कावळा, वटवाघूळ, साप, विंचू, कबूतर अशा प्राण्या पक्षांचे फोटो लावू नये. वास्तू शास्त्रानुसार अशा फोटोंमुळे घरातील शांती नष्ट होऊन कलह वाढतो.
बेडरूममध्ये कधीही हिंसंक दृष्य, लढाई, भांडणं यांचे फोटो लावू नये.त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं होण्याची शक्यता असते असं मानलं जातं.