या दिवाळीला माता लक्ष्मीला करायचे असेल प्रसन्न तर वास्तूशास्त्रानुसार सजवा घर
दिवाळी निमीत्त्य तुम्ही घरात काही बदल करण्याच्या तयारीत अलाल तर वास्तूशास्त्रानुसार केलेले बदल तुम्हाला लाभदायक ठरतील. दिवाळीत घर सुंदर आणि आकर्षित बनवण्यासाठी वास्तूनुसार घरात वस्तू ठेवणे खूप गरजेचे आहे.
अगदी थोड्याच दिवसात दिवाळीला (Diwali 2023) सुरूवात होणार आहे. प्रत्त्येकच्याच घरी दिवाळीची खरेदी आणि तयारीची लगबग सुरू असेल. दिवाळी निमीत्त्य तुम्ही घरात काही बदल करण्याच्या तयारीत अलाल तर वास्तूशास्त्रानुसार केलेले बदल तुम्हाला लाभदायक ठरतील. दिवाळीत घर सुंदर आणि आकर्षित बनवण्यासाठी वास्तूनुसार घरात वस्तू ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी वास्तू जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तूनुसार घरामध्ये पलंग कोणत्या दिशेला असावा, घरात जेवणाचे टेबल असेल तर ते कोणत्या दिशेला असावे, घरात देवघर कोणत्या दिशेला असावे तेही जाणून घेऊया.
जेवणाचे टेबल या दिशेला ठेवावे
घरात डायनिंग टेबल असणे खूप शुभ मानले जाते. जेवण नेहमी स्वयंपाक घरातच करावे. अंथरुणावर जेवण केल्याने वास्तूदो, लागतो, तसेस त्यामुळे अन्नाचा अपमानही होतो. जेवणाची खोली दक्षिण, पश्चिम किंवा पूर्व दिशेला स्वयंपाकघराशी जोडलेली असावी. या व्यतिरिक्त, जर तुम्ही घरात जेवणाचे खोली बनवत असाल तर त्यासाठी आदर्श दिशा पश्चिम आहे कारण ते अन्न खाण्यासाठी सर्वात शुभ स्थान मानले जाते.
पलंगाची दिशा
जर तुम्ही घरी नवीन बेड आणत असाल किंवा तुमच्या घरातील फर्निचर बदलण्याचा विचार करत असाल तर या वास्तु टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. बेडरूममध्ये पलंग नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावा. विशेष काळजी घ्या की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे डोके नेहमी दक्षिण दिशेला असावे. पाय दक्षिणेकडे तोंड करून कधीही झोपू नका. वास्तुनुसार हे शुभ मानले जात नाही. जर तुम्ही दिशा बदलण्याचा विचार करत असाल तर ही दिशा पाळा.
देवघर या दिशेला असावे
जर तुम्ही घरात मंदिराची स्थापना करत असाल तर घराचे मंदिर उत्तर-पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे याची विशेष काळजी घ्या. ईशान्य दिशेला देवांचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे ही दिशा मंदिरासाठी शुभ मानली जाते. दिवाळीपूर्वी घरातील मंदिराची वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती ईशान्य दिशेला ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)