अवघ्या काही दिवसात शनि आणि सूर्याची होणार युती, या राशींना सळो की पळो करून सोडणार

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनि पितापूत्र आहेत. पण या दोघांमध्ये शत्रूत्वाचं नातं आहे. एकमेकांचं अजिबात पटत नाही. त्यामुळे हे दोन ग्रह जर एकत्र आले तर निश्चितच राशीचक्रावर परिणाम होईल. 17 दिवसानंतर अशीच स्थिती महिनाभर राहणार आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना जगणं कठीण होईल.

अवघ्या काही दिवसात शनि आणि सूर्याची होणार युती, या राशींना सळो की पळो करून सोडणार
शनि सूर्याची युती राशींसाठी ठरणार डोकेदुखी, होणारी कामंही लांबणीवर पडणार
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 3:33 PM

मुंबई : आयुष्यात चढउतार येत असतात. काही दु:ख पचवणं सोपं असतं तर काही दु:ख पेलणं खूपच कठीण होतं. त्यात ग्रहमान अनुकूल नसेल तर मात्र काही बोलायलाच नको. सध्या ग्रहांची स्थिती त्यापैकी बरी आहे. पण 17 दिवसानंतर सूर्यदेव थेट शनिच्या राशीत शनिसोबत एकत्र येणार आहेत. सूर्य आणि शनि एकमेकांची तोंड पाहात नाही अशी स्थिती आहे. त्यात शनिच्याच घरात सूर्य येणार आहे. तिथे त्यांचं स्वागत करण्यासाठी शनिदेव आधीच विराजमान आहेत. त्यामुळे महिन्याभराच्या कालावधीत भांड्याला भांड लागण्याची स्थिती आहे. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. 11 फेब्रुवारीपासून शनि अस्ताला जाणार आहे. म्हणजेच सूर्य जवळ आल्याने तेज कमी होणार आहे. सूर्य कुंभ राशीत 13 फेब्रुवारीला विराजमान होईल आणि या दोघांची अशुभ युती तयार होईल. ही युती 14 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपर्यंत कायम राहील.

सूर्य शनिच्या युतीमुळे तीन राशींना होणार त्रास

कर्क : या राशीच्या अष्टम स्थानात ही युती होत आहे. अडीचकीचा काळात सूर्य आल्याने अडचणीत वाढ होईल. अडचणींचा डोंगर समोर उभा राहील. एक ढिगळ शिवलं की दुसरं समोर येईल. त्यामुळे या काळात पुरते हैराण होऊन जाल. विनाकारण पैसा खर्च होईल. कामाच्या ठिकाणी दबाव वाढेल त्यामुले काय करू काय नको असं होईल. घरातही चिडचिड होईल. त्यामुळे या कालावधीत शांत राहणं फायद्याचं ठरेल. व्यवसायात प्रतिस्पर्ध्याकडून मात मिळू शकते.

कुंभ : या राशीत सूर्य आणि शनिची युती होत आहे. शनि साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. त्यामुोल नोकरी करणाऱ्या जातकांना त्रासाला सामोरं जावं लागेल. उद्योगधंद्यातही काही अक्रित घडामोडी घडतील. विश्वासाचे मजूर मोक्याच्या क्षणी पाठ दाखवू शकतात. त्यामुळे संपूर्ण धंदा चौपट होण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक स्थिती या काळात वाईट होऊ शकते. विचारपूर्वक खर्च करण्याचा प्रयत्न करा.

सिंह : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्य आणि शनि एकत्र येत आहे. पार्टनरशिप आणि पतीपत्नीशी निगडीत हे स्थान आहे. भागीदारीच्या धंद्यात मोठी उलथापालथ होऊ शकते. धंदा जोडीदार आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तसेच मिळालेल्या प्रॉफिटमधून मोठी रक्कम घेण्याची शक्यता आहे. पत्नीसोबत काही कारणावरून वाद होतील. काय कारण, कशासाठी याचा काहीच थांगपत्ता लागणार नाही. काही कारणामुळे अस्वस्थ व्हाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.