Shani Dev : वर्ष 2024 मध्ये शनिदेव करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींना मिळणार उत्तम साथ

2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नव्या योजनांसह प्रत्येक नवीन वर्षाचं गणित आखत आहे. जे या वर्षी मिळालं नाही त्यासाठी पुढच्या वर्षासाठी संकल्प केला जाणार आहे. तत्पूर्वी ग्रहांची साथ मिळणार का? शनिदेवांची स्थिती कशी असेल? याकडे जातकांचं लक्ष लागून आहे.

Shani Dev : वर्ष 2024 मध्ये शनिदेव करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींना मिळणार उत्तम साथ
Shani Dev : शनिदेव 2024 मध्ये कुंभ राशीत राहणार, पण नक्षत्र बदलामुळे तीन राशींचं नशीब पालटणार
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 4:18 PM

मुंबई : नववर्ष 2024 हे वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे नव्या वर्षासाठी आतापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असेल यासाठी जातकांकडून तयारी सुरु आहे. ग्रहांची साथ मिळेल का? त्यात पापग्रह असलेला शनिदेव कशी फळं देईल, इथपर्यंत विचार केला जात आहे. प्रत्येक ग्रहाचा तसा पाहिला तर राशीचक्रावर परिणाम होत असतो. थोड्या अधिक प्रमाणात प्रत्येक जातकांना शुभ अशुभ फळं भोगावी लागतात. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमान आणि गोचर काळात ग्रहाची स्थिती यामुळे जातकांवर परिणाम होत असतो. त्यात पापग्रह असलेल्या शनि, राहु-केतुची स्थिती महत्त्वाची आहे. तसं पाहिलं तर 2024 या वर्षात शनिदेव राशीबदल करणार नाहीत. कुंभ राशीतच शनिचं ठाण असणार आहे. या दरम्यान वक्री, अस्त-उदय आणि नक्षत्र परिवर्तन अशी स्थिती असेल. त्यामुळे जातकांना कमी अधिक प्रमाणात फटका किंवा फायदा होऊ शकतो. शनिदेव 2024 मध्ये शतभिषा नक्षत्रातून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळेल.

या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मेष : शनिदेवांना भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कारण कुंभ राशीतील शनिदेव या राशीच्या उत्पन्न स्थानात आहे. त्यामुळे 2024 या वर्षात उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. काम करत असलेल्या क्षेत्रात मनासारख्या घडामोडी घडतील. जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

वृषभ : कुंभ राशीत स्थित असलेले शनिदेव या राशीच्या दशम म्हणजेच कर्मस्थानात गोचर करत आहे. नक्षत्र बदल करताच या राशीच्या जातकांनाही लाभ मिळेल. 2024 या वर्षात आतापर्यंत कामात आलेल्या अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना विशेष लाभ मिळेल. मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या इन्क्रिमेंटमध्ये फायदा होईल. त्यामुळे आर्थिक गणितं सुटतील. मोठ्या पदावर नियुक्ती होऊ शकते. राजकारणातील लोकांना लाभ मिळेल.

सिंह : कुंभ राशीतील शनिदेव या राशीच्या सप्तम भावात गोचर करत आहे. त्यामुळे नक्षत्र बदल होताच निश्चित लाभ मिळेल. कौटुंबिक पातळीवर बरेच बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. अध्यात्मिक कार्यात मन रमेल. जीवनात सुख समृद्धी वाढेल. वाहन आणि प्रॉपर्टीचं सुख प्राप्त होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....