200 वर्षानंतर तयार झाला अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग, चार राशींच्या अडचणी वाढणार

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा गोचर आणि त्यांची स्थिती महत्त्वाची ठरते. पण काही शुभ अशुभ योग अनेक वर्षांनंतर घडतात. असाच एक सर्वात अशुभ असलेला पापकर्तरी योग तयार झाला आहे. त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

200 वर्षानंतर तयार झाला अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग, चार राशींच्या अडचणी वाढणार
200 वर्षानंतर पापग्रहांच्या अशा स्थितीमुळे चार राशींची डोकेदुखी वाढणार, धनहानी होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 5:03 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. इतकंच काय तर मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो. ग्रहांची गोचर स्थिती कमी अधिक असल्याने एकाच राशीत एकापेक्षा अधिक ग्रह येतात. त्यामुळे शुभ आणि अशुभ योग घडून येतात. सध्या मेष राशीत गुरु राहुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे. दुसरीकडे आता चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. हा योग चार राशी चार पापग्रहांमध्ये फसतात तेव्हा असं होतं. खासकरून चारही राशींचे स्वामी पापग्रहांसोबत येतात. मेष राशीत पापग्रह राहु, तर कुंभ राशीत शनि ग्रह स्थित आहे.

या राशींच्या अडचणीत होणार वाढ

वृषभ : या राशीच्या जातकांना अशुभ योगाचा फटका बसू शकतो. कारण वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र काही दिवसानंतर मंगळासोबत येणार आहे. या राशीच्या गोचर कुंडलीत वरच्या बाजूला म्हणजेच मेष राशीत राहु ग्रह आहे. तर सूर्य ग्रह कर्क राशीत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात नव्या कामाला सुरुवात करू नका. तसेच बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

कर्क : या राशीचे जातकही पापकर्तरी योगाच्या जाळ्यात अडकणार आहे. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र हा मंगळ आणि सूर्याच्या मधोमध अडकला आहे. त्यामुळे सावधपणे पावलं उचलण्याची गरज आहे. या काळात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. अपघात या काळात होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. उत्पन्न घटल्याने अडचणी वाढ होईल.

कन्या : या राशीचे जातकंही पापकर्तरी योगामुळे पुरते हैराण होणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. पण सुर्याला क्रुर ग्रह मानला जातो. कन्या राशीच्या एका बाजूला मंगळ आणि दुसऱ्या बाजूला केतु आहे. त्यामुळे जातकांच्या अडचणीत वाढ होईल. इतकंच काय तर आर्थिक नुकसान होई शकतं. नोकरी करणाऱ्या जातकांना कमाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मीन : या राशीचा स्वामी ग्रह गुरु सध्या मेष राशीत विराजमान असून राहुसोबत युती आहे. या युतीमुळे अशुभ चांडाळ योग तयार जाळा आहे. त्यात शनिची तिसरी दृष्टी पडली आहे. एका बाजूला शनि आणि दुसऱ्या बाजूला राहु अशी स्थिती आहे. त्यामुळ कौटुंबिक वाद, आर्थिक फटका या काळात बसू शकतो. वादामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे वादापासून दूर राहिलेलं बरं राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.