जोडे-चपला घालून जेवण करणे योग्य की अयोग्य? शास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मात अन्न आणि अग्नी या दोन्ही गोष्टी अतिशय पवित्र मानल्या जातात आणि या दोन्ही गोष्टी स्वयंपाकघरात एकत्र वास्तव्य करतात तसेच ते दोन्ही मानवी भूक भागवतात. त्यामुळे हिंदू संस्कृतीत स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे. त्यामुळे शूज आणि चप्पल घालून अन्न ग्रहण करण्यासारखे पवित्र कार्य केले तर..
मुंबई : हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. म्हणून अन्न खाणे हे सर्वात पवित्र कृत्यांपैकी एक मानले जाते. अन्नपूर्णा देवी अन्न पुरवते तसेच शिव देखील अन्न असहाय्य आहे. याच कारणामुळे ते काशीतील अन्नपूर्णा देवीसमोर भिक्षापात्र घेऊन उभे आहेत, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय स्वयंपाक करताना अग्नीचा वापर केला जातो त्यामुळे अन्न हे सूर्यदेवतेप्रमाणे पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात वेदकाळापासून अग्नीची पूजा केली जाते. त्यामुळे धार्मिक किंवा पवित्र कार्य करताना बूट घालणे हे वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) आणि शास्त्रीय दोन्ही दृष्टिकोनातून निषेधार्ह आहे.
यामागचे शास्त्रीय कारणे जाणून घेऊया
जोडे आणि चप्पलमध्ये अनेक प्रकारची घाण, चिखल, विष्ठा आणि दुर्गंधीयुक्त गोष्टी असतात. ज्यामुळे तुमच्या अन्नामध्ये बॅक्टेरिया तयार होतात ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, अशा परिस्थितीत जोडे आणि चप्पल घालून खाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही.
धार्मिक कारण
हिंदू धर्मात अन्न आणि अग्नी या दोन्ही गोष्टी अतिशय पवित्र मानल्या जातात आणि या दोन्ही गोष्टी स्वयंपाकघरात एकत्र वास्तव्य करतात तसेच ते दोन्ही मानवी भूक भागवतात. त्यामुळे हिंदू संस्कृतीत स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे. त्यामुळे शूज आणि चप्पल घालून अन्न ग्रहण करण्यासारखे पवित्र कार्य केले तर तुम्हाला नकारात्मकतेचा सामना करावा लागतो तसेच माता अन्नपूर्णा त्या व्यक्तीवर नाराज होते. याच धार्मिक कारणामुळे हिंदूंच्या स्वयंपाकघरातही चपला घालण्यास मनाई आहे.
अन्न कसे ग्रहण करावे?
हातपाय धुवून बसून जेवणासारखी पवित्र कृती करावी. हे लक्षात ठेवा की बेडवर बसून कधीही अन्न खाऊ नये. यामुळे माता अन्नपूर्णा आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रोज शूज आणि चप्पल काढून स्वच्छ राहिल्यानंतरच जेवण घेतले तर बरे होईल. याने तुमचा आजारांपासूनही बचाव होईल.
याशिवाय अनेकांना अंथरूणावर बसून जेवण्याची सवय असते. ती देखील वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीची आहे. यामुळे अन्नदोष लागतो. अशा प्रकारे अन्न ग्रहण केल्याने वास्तूदोषदेखील निर्माण होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)