Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो.

Kalsarpa Dosh : मानसिक तनाव आणि आर्थिक हानीचा सतत येत असेल अनुभव तर पत्रिकेत असू शकतो कालसर्प दोष
काल सर्प दोष
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 8:11 PM

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या पत्रिकेत ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगामुळे काही शुभ आणि अशुभ योग बनतात. पत्रिकेत स्थित असलेल्या शुभ योगामुळे व्यक्तीला लाभ होत असतो, तर दुसरीकडे अशुभ योग आणि दोषामुळे जीवनात काही काळासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अशुभ योगांपैकी एक म्हणजे काल सर्प दोष (Kalsarpa Dosh). हा दोष शापित मानला जातो. खरं तर, ज्योतिष शास्त्राच्या तज्ञांचे म्हणणे आहे की काल सर्प दोषाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार काल सर्प दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.

काल सर्प दोषाची लक्षणे काय आहेत?

ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी पत्रिकेत काल सर्प दोष येतो, त्या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे त्यांनाच काल सर्प दोषामुळे होणाऱ्या त्रासाचा अंदाज येऊ शकतो. यासोबतच काल सर्प दोषामुळे जातकांना मुलांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती कमी वेळात वारंवार नोकरी बदलत असेल तर ते काल सर्प दोषाचे लक्षण आहे. याशिवाय एखाद्या वेगळ्या कामात स्थिरतेचा अभाव असेल, अशा स्थितीत ज्योतिष शास्त्राचे तज्ज्ञ ते काल सर्प दोषाचे लक्षण मानतात.

काल सर्प दोष निवारण

कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपायही सांगितले आहेत. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने घरातील पूजेच्या ठिकाणी मोरपंख घातलेली श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांची नियमित पूजा करावी. याशिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा जप देवाच्या पूजेदरम्यान किमान 108 वेळा करावा.

हे सुद्धा वाचा

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री, त्रयोदशी इत्यादी दिवशी भगवान शिवाला रुद्राभिषेक करावा. यासोबतच मातीपासून महादेव बनवून त्यांची पूजा केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार नागदेवतेची पूजा करूनही या दोषापासून मुक्ती मिळू शकते. अशा स्थितीत अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक यांची पूजा दर महिन्याच्या पाचव्या तिथीला करावी. नागदेवतेची पूजा करण्यापूर्वी महादेवाची पूजा करणे आवश्यक आहे.

काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यक्तीने शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर तांबे किंवा चांदीचा नाग अर्पण करावा. असे केल्याने काल सर्प दोषापासूनही आराम मिळतो असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.