Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kark Rashifal 2023: कर्क राशीला मिळेल महत्त्वाच्या व्यक्तीची साथ, या एका चुकीपासून राहा सावध

वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल...

kark Rashifal 2023: कर्क राशीला मिळेल महत्त्वाच्या व्यक्तीची साथ, या एका चुकीपासून राहा सावध
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 11:34 AM

मुंबई,  जोतिष शास्त्राच्या दृष्टिने नवीन वर्ष 2023 (Cancer Yearly Horoscope 2023) कसे जाणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.  कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष यश मिळवून देणारे ठरणार आहे का?  पैसा, नातेसंबंध, करिअर-व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्यासाठी हे वर्ष कसे असेल? कोणत्या बाबतीत तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल? कर्क राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल ते जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

हे सुद्धा वाचा

करियरच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला सावधपणे पुढचे पाऊल टाका. वर्षभर चांगली प्रगती करण्यासाठी, सुरुवातीपासूनच  संयमाने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मकर राशीपासून कुंभ राशीत शनीचा राशी बदल आठव्या स्थानात होईल. कुंभ राशीतील शनि आरोग्याशी संबंधित समस्यांना जन्म देऊ शकतो. दिनचर्यामध्ये नियमितता वाढवा.

योगासन आणि ध्यान प्राणायामाची सवय वाढवा. जानेवारी ते मार्च ही पहिली तिमाही अधिक आव्हानात्मक असू शकते. करिअर व्यवसायात सावधगिरी वाढवण्याची गरज आहे. जुनी प्रकरणे समोर येऊ शकतात. आहाराबाबत काळजी घ्या.  दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका. विरोधकांपासून सावध राहा.

एप्रिल ते जून सकारात्मक राहील

दुसरी तिमाही, एप्रिल ते जून, सहजतेचे आणि सकारात्मकतेचे सूचक आहे. अडथळे कमी होतील. सुधारणा प्रक्रिया जलद होईल. सकारात्मक बदल हाेतील. भाग्य साथ देईल. लांबचा प्रवास करता येईल. मनोरंजन आणि धार्मिक कार्यात रस घ्याल असेल. महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आरोग्य सुधारेल.  परीक्षा स्पर्धेत अपेक्षित निकाल लागतील. मेहनतीच्या तुलनेत यशाची टक्केवारी चांगली राहील.

वर्षाच्या शेवटी या चुका करू नका

वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. राहू-केतूच्या राशी बदलामुळे धैर्य आणि पराक्रम वाढेल. यासोबतच राहू गुरूसोबत भाग्यस्थानात भ्रमण करेल. या परिस्थितीमुळे सहज बनलेल्या कामांमध्ये अडथळे वाढतील.  लोकांबद्दल आदर कमी होईल. दानधर्म करा. हट्टीपणा आणि अहंकार सोडून नम्रता आणि विवेक अंगिकारा. भावांचे सहकार्य वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत
भाजपचं कमळाबाई असं बारस बाळासाहेब ठाकरेंनीच केलं - संजय राऊत.
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप.
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?.
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान.
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.