Ketu Gochar 2023 : चित्रा नक्षत्रात केतु करणार प्रवेश, या राशींच्या संकटात होणार वाढ

पापग्रह केतु सध्या तूळ राशीत ठाण मांडून आहे. पण नक्षत्र गोचर ठराविक कालावधीनंतर करत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम राशीचक्रावर होत आहे.

Ketu Gochar 2023 : चित्रा नक्षत्रात केतु करणार प्रवेश, या राशींच्या संकटात होणार वाढ
Ketu Gochar 2023 : पापग्रह केतु चित्रा नक्षत्रात प्रवेश करताच करणार उलथापालथ, या राशींना बसणार फटका
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 7:49 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहु, केतु, शनि आणि मंगळ या ग्रहांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. या ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. राहु आणि केतु एका राशीत दीड वर्षे राहतात. न्यायदेवता शनिदेव एका राशीत अडीच वर्षे, तर मंगळ ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. राहु ग्रह मेष राशीत, केतु ग्रह तूळ राशीत, तर शनि कुंभ राशीत आहे. असं असलं तरी या ग्रहांचा नक्षत्र परिवर्तनाचा कालावधी हा झपाट्याने बदलत असतो. 26 जून 2023 रोजी केतु ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे राशीचक्रातील पाच राशींना जबरदस्त फटका बसणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना सावध राहणं गरजेचं आहे.

या राशीच्या जातकांना बसणार फटका

मिथुन : या राशीच्या जातकांना केतु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा नकारात्मक परिणाम भोगावा लागू शकतो. खासकरून विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. तसेच मुलांच्या हट्ट करण्याच्या प्रमाणात वाढ होईल. तसेच त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करा. चुकीचं पाऊल उचलणार नाही यासाठी लक्ष ठेवाल.

कर्क : या राशीच्या जातकांवर केतु ग्रहाचं चित्र नक्षत्रातील भ्रमण थेट आरोग्यावर परिणाम करेल. यामुळे रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ येईल. आर्थिक स्थिती बिघडल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण राहील. काही कामासाठी विनाकारण पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.

कन्या : या राशीच्या जातकांना कौटुंबिक कलहाला सामोरं जावं लागू शकतं. जमिनीच्या वादामुळे घरातील वाद विकोपाला जाऊ शकतो. न्यायालयान प्रकरणामुळे डोकेदुखी वाढेल. तसेच काही चढ उतार या काळात अनुभवायला मिळू शकतात. लोकं तुमच्या पडत्या काळाचा गैरफायदा घेतील त्यामुळे अतीव दु:ख होईल.

मकर : या राशीच्या जातकांना सध्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. केतुच्या चित्रा नक्षत्रातील स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी ताण दिसून येईल. हाती घेतलेली काम झटपट पूर्ण होत नसल्याने चीडचीड होईल. तसेच केलेल्या कामात काही चुका निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मन शांत ठेवून चिकाटीने काम करावं लागेल. काही कारणास्तव समाजात मानसन्मान मिळणार नाही. तसेच नातेवाईकही बदनामी करण्याची संधी सोडणार नाहीत.

मीन : या राशीच्या जातकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकोत. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. तसेच आर्थिक घडी पुरती या काळात विस्कटून जाईल. या काळात चोरी किंवा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. दूरचा प्रवास करणं या काळात टाळा. तसेच सुरक्षेचे सर्व नियम पाळा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.