Krishna Janmashtami 2023 : आज जन्माष्टमीला राशीनुसार श्रीकृष्णला दाखवा नैवेद्य, पूर्ण होतील सर्व मानोकामना
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार काही खास नैवेद्य आणि उपाय आहेत, ज्यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळतात. यंदाच्या जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.
मुंबई : जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami 2023) सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार काही खास नैवेद्य आणि उपाय आहेत, ज्यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळतात. त्यामुळे आपल्या राशीनुसार भगवान श्रीकृष्णाला अन्न अर्पण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.
राशीनुसार कोणता नैवेद्य दाखवावा?
- मेष- मेष राशीचे लोकं बेसनाचे लाडू, माखणा खीर, बर्फी आणि तूप देऊ शकतात. यामुळे तुमची संपत्ती वाढते.
- वृषभ- या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी लाडू गोपाळांना लोणी, गोड दही, गाईचे दूध, बर्फी आणि बुंदीचे लाडू अर्पण करावेत. यातून तुम्हाला शुभ परिणाम मिळतात.
- मिथुन- मिथुन राशीच्या जन्माष्टमीला लाडू गोपाकाला दही, रसगुल्ला, बदाम बर्फी आणि कलाकंद अर्पण करा. यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीला फायदा होतो.
- कर्क- कर्क राशीचे लोक गाईचे दूध-केशर, बुंदीचे लाडू आणि रसगुल्ला देऊ शकतात. याचा तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फायदा होईल.
- सिंह- सिंह राशीच्या लोकांनी लोणी, मिश्री, गायीच्या दुधापासून बनवलेले फिरणी, बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढते.
- कन्या- जन्माष्टमीला कन्या राशीचे लोक माव्याचे लाडू, दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर, गोड दही आणि बुंदीचे लाडू देऊ शकतात. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
- तूळ- तूळ राशीचे लोक तूप, लोणी, बुंदीचे लाडू आणि रसगुल्ला देऊ शकतात. असे केल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल.
- वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तूप, लोणी, दही, बेसन लाडू, माखणा खीर आणि बर्फी अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होतो.
- धनु- धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीला फायदा होतो.
- मकर- मकर राशीच्या लोकांना साखर, लोणी, दही, बेसन लाडू आणि बदाम अर्पण करणे शुभ मानले जाते. याचा तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फायदा होईल.
- कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी बेसन लाडू, माखणा खीर आणि बालुशाहीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
- मीन- मीन राशीच्या लोकांना खीर, बुंदीचे लाडू आणि बर्फी सोबत केशर अर्पण केल्याने शुभ फळ मिळते.