Lakshmi Narayan Yog: 13 जुलैला बनतोय लक्ष्मी नारायण योग; या राशींना होणार फायदा

13 जुलै 2022 रोजी सकाळी 11:01 वाजता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जो 7 ऑगस्टपर्यंत राहील. दुसरीकडे, दुसरा शुभ ग्रह बुध आधीच मिथुन राशीत आहे. म्हणजेच मिथुन राशीमध्ये शुक्र आणि बुध या दोन शुभ ग्रहांचा संयोग आहे. बुध आणि शुक्र या ग्रहांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी […]

Lakshmi Narayan Yog: 13 जुलैला बनतोय लक्ष्मी नारायण योग; या राशींना होणार फायदा
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 6:13 PM

13 जुलै 2022 रोजी सकाळी 11:01 वाजता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जो 7 ऑगस्टपर्यंत राहील. दुसरीकडे, दुसरा शुभ ग्रह बुध आधीच मिथुन राशीत आहे. म्हणजेच मिथुन राशीमध्ये शुक्र आणि बुध या दोन शुभ ग्रहांचा संयोग आहे. बुध आणि शुक्र या ग्रहांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग (mahalaksmi yog)  असेही म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) शुक्र हे संपत्ती आणि विलासाचे प्रतीक आहे. शुक्र सौंदर्य आणि विवेक देतो.  जीवनात सुखसोयी आणि चैनीच्या गोष्टी मिळवण्याची संधी शुक्र देतो. विलासी आणि महागड्या वस्तूंचा कारक ग्रह म्हणून शुक्राला ओळखले जाते. हे प्रेम, प्रणय, लक्झरी, सौंदर्य, फॅशन डिझायनिंग, कला, वैवाहिक आनंद या गोष्टी शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते. बुध-शुक्र ग्रह आणि महालक्ष्मी योग यांच्या संयोगाने काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

  1. सिंह- या राशीच्या लोकांना या राशी परिवर्तनानंतर चांगले पैसे मिळतील. पैशांची बचत होईल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकतात. तुमची संभाषण शैली तुमच्या जीवनात अनेक अनुकूल बदलांची प्रबळ शक्यता निर्माण करेल.
  2. तूळ- शुक्राच्या या राशी परिवर्तना दरम्यान तूळ राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळताना दिसत आहे. या काळात राशीची यशाकडे वाटचाल होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच तुम्ही कुटुंब आणि मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. मुलांकडून चांगली माहिती मिळू शकते. लक्ष्मीनारायण योगामध्ये तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. कर्जात बुडालेल्या पैशांची वसुली होऊ शकते.
  3. कुंभ- या राशीच्या लोकांची स्थिती चांगली राहील. तुमच्या राशीमध्ये आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. या राशीचे लोक जे व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना शुभ परिणाम मिळतील. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.