12 महिन्यानंतर मीन राशीत तयार होतोय लक्ष्मी नारायण योग, पुढचं वर्ष या राशींसाठी जाणार चांगलं
2025 या वर्षात नऊही ग्रहांची उलथापालथ होणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ योग पाहायला मिळणार आहे. मीन राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. या योगामुळे तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.
नवग्रहांमध्ये बुध आणि शुक्र या ग्रहांना शुभ ग्रहांचा दर्जा दिला गेला आहे. या ग्रहांची कृपा असली तरी बुद्धी आणि पैसा दोन्ही खेळतं राहतं. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. तर शुक्र हा भौतिक सुख आणि मानसन्माचा कारक ग्रह आहे. अशात बुध आणि शुक्राची युती झाली तर ती जातकांसाठी फलदायी ठरते. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायणसारखा राजयोग तयार होतो. त्याची शुभ फळं राशीचक्रात अनुभवायला मिळतात. तसं पाहिलं तर हे दोन्ही ग्रह अल्पावधीतच राशीबदल करतात. त्यामुळे या ग्रहांची कोणासोबत युती आघाडी होतच असते. नववर्ष 2025 बाबत सांगायचं तर या दोन्ही ग्रहांची युती मीन राशीत होणार आहे. त्यामुळे जवळपास एका वर्षानंतर मीन राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह 28 जानेवारीला मीन राशीत प्रवेश करेल आणि 31 मे पर्यंत इथेच राहणार आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 27 फेब्रुवारीला रात्री 11 वाजून 46 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल आणि दोघांची युती होईल. म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. बुध ग्रह मीन राशीत मेष राशीत 7 मे रोजी प्रवेश करेल आणि हा योग संपुष्टात येईल. म्हणजेच 69 दिवस लक्ष्मी नारायण योग असणार आहे.
या राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या 12 व्या स्थानात लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. या राशीच्या जातकांना वडिलोपार्जित जमिनीतून चांगली मिळकत मिळेल. इतकंच काय तर समाजात मानसन्मान देखील वाढेल. करिअरमध्ये नवी उंची गाठण्यास मदत होईल. अध्यात्मिक यात्रा करण्याचा योग जुळून येईल. तसेच कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील.
मिथुन : बुध आणि शुक्राची युती या राशीच्या दहाव्या स्थानात होईल. या स्थानातील युती जातकांना भौतिक सुखांची अनुभूती देईल. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या चांगली ऑफर मिळू शकते. नशिबाची पूर्ण साथ कालावधीत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची उत्तम साथ तु्म्हाला लाभेल. तसेच बचत करण्यात यश मिळेल.
मीन : या राशीच्या लग्न स्थानात म्हणजेच प्रथम स्थानात ही युती होणार आहे. स्वभावात कमालीचा फरक या कालावधीत दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळू शकते. भागीदारीच्या धंद्यात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)