Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 25 May 2022: जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते, घरात शुभ कार्य घडू शकते

कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी? आज तुमचे ग्रह तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Daily Horoscope 25 May 2022: जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते, घरात शुभ कार्य घडू शकते
आजचे राशी भविष्य
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 5:10 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

तुळ (Libra) –

तुमच्या सकारात्मक आणि सहकार्याच्या वागणुकीमुळे तुम्हाला कुटुंबात आणि समाजात विशेष मान सन्मान मिळेल. जमिनीशी संबंधित कोणतीही वादग्रस्त समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात यश नक्कीच मिळेल. वैयक्तिक कामासोबतच सामाजिक उपक्रमांकडेही लक्ष देणं गरजेचे आहे. एखाद्याच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःच ही नुकसान करू शकता. कोणाच्या ही बोलण्यात येवू नका, हे लक्षात ठेवा. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसायातील बदलाशी संबंधित योजनांवर काम सुरू होईल. यावेळी, मार्केटिंग आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला अधिक वेळ घालवा. नोकरदार लोकांनी रागात येऊन बॉस आणि अधिकाऱ्यांशी संबंध बिघडवू  नयेत.

लव्ह फोकस- एखाद्याच्या लग्नाच्या नियोजनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांमध्येही जवळीकता येईल.

हे सुद्धा वाचा

खबरदारी- कामाच्या जास्त ताणामुळे मानसिक व शारीरिक थकवा राहू शकतो. स्वतःसाठीही थोडा वेळ काढा.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 5

वृश्चिक (Scorpio) –

आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिका आणि वर्तमान काळ चांगला करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला योग्य यश मिळेल. जमिनीशी संबंधित कोणतीही खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या ध्येयाची जाणीव ठेवली पाहिजे. नकारात्मक प्रवृत्ती असलेले मित्रही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतात. ज्येष्ठ अनुभवी लोकांचा सल्ला व मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ते काम सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नोकरदार लोकांवर काही अधिकार येऊ शकतात.

लव्ह फोकस- घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. प्रेमप्रकरणात वेळ आणि पैसा वाया घालवू नका.

खबरदारी- हंगामी आजारांच्या समस्या कायम राहतील. पण थोडी काळजी घेतल्यास तुम्हीही निरोगी राहाल.

शुभ रंग – नारिंगी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 1

धनु (Sagittarius)-

धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल. तुम्ही स्वत:ला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवाल. परिस्थिती आणि काळ तुम्हाला खूप मदत करतोय. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुमची पूर्ण क्षमता आणि मेहनत पणाला लावा.

राग आणि घाई यासारख्य गोष्टींवर नियंत्रण ठेवा. नातेवाईक तसंच शेजऱ्यांशीवादा सारखी परिस्थिती उद्भवु शकते. घरातील ज्येष्ठांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला कायमच मिळत आलं आहे. त्याचं म्हणणं मार्गदर्शन लक्ष पूर्वक ध्यानात घ्या. प्रोडक्शन संबंधित कामात घट झाल्यामुळे व्यवसायात तणाव निर्माण होऊ शकतो. इंपोर्ट-एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. सरकारी नोकरीत कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कामात दुर्लक्ष करू नका. कारण तक्रार होण्याची परिस्थिती आहे.

लव्ह फोकस – घरातील वातावरण गोड राहील. कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ शकते.

खबरदारी – संसर्गासारख्या समस्या असू शकतात. विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे.

शुभ रंग – निळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 6

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.