शनि देवांचं राशी परिवर्तन; या 4 राशींच्या लोकांचं नशीबच बदलणार, मोठा योग
ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देवांना सर्वात प्रभावी ग्रह माणण्यात आलं आहे. न्यायाची देवता म्हणून देखील शनि देवांना ओळखलं जातं. शनि देव व्यक्तीच्या चांगल्या अथवा वाईट कर्मानुसार त्याला फळ देतो.

ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देवांना सर्वात प्रभावी ग्रह माणण्यात आलं आहे. न्यायाची देवता म्हणून देखील शनि देवांना ओळखलं जातं. शनि देव व्यक्तीच्या चांगल्या अथवा वाईट कर्मानुसार त्याला चांगलं किंवा वाईट फळ देतात. इतर ग्रहांच्या तुलनेत शनि देवांची चाल ही खूप धिमी असते. ते दर अडीच वर्षानंतर रास बदलतात. शनिवार 29 मार्च 2025 रोजी शनि देवांनी आपलं राशी परिवर्तन केलं आहे. शनि देवांनी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढील अडीच वर्ष ते आपला मुक्काम याच राशीमध्ये ठेवणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार शनि देव जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा व्यापक प्रभाव हा मानवी जीवनावर पडतो. शनि देवांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम हा बाराही राशींवर होतो. काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडतो, तर काही राशींना अडचणी येतात. शनि देवांनी आता आपल्या अस्त अवस्थेमध्ये मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर 6 एप्रिलला मीन राशीमध्ये त्यांचा उदय होणार आहे. याचा चार राशींवर खूपच सकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्या चार राशी नेमक्या कोणत्या आहेत, त्याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
कर्क रास – शनि देवांचा 6 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये उदय होणार आहे, मीन राशीमध्ये उदय झाल्यानंतर त्याचा कर्क राशीवर खूपच सकारात्मक प्रभाव पडणार आहे. कर्क राशीची अडीचकी समाप्त होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांचा अचानक धन प्राप्तीचा योग येऊ शकतो. उत्पन्नाचे दुसरे साधन देखील निर्माण होतील. आयुष्यात पैशांशी संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत, तेवढ्या सर्व दूर होतील. काही जण नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना चांगली नोकरीची संधी मिळेल.
तुळ रास – तुळ राशीवर देखील खूप शुभ प्रभाव पडणार आहे, गेल्या अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम अचानक मार्गी लागण्याचा योग आहे. तसेच सर्व समस्या दूर होणार आहेत. तुळ राशीप्रमाणेच वृश्चिक आणि मकर राशीवर देखील शनि देवांच्या राशीपरिवर्तनाचा शुभ प्रभाव पडणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)