Numerology and Marriage : कोणत्या मूलांकाने प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाचा करेक्ट कार्यक्रम होतो; तुमचा मूलांक कोणता?

ज्योतिषशास्त्रातील अंकज्योतिष प्रेम आणि वैवाहिक जीवनावर कसा प्रभाव पाडते यावर हा लेख प्रकाश टाकतो. मूलांक आणि भाग्यांकाची गणना कशी करावी आणि प्रत्येक मूलांकाचे वैशिष्ट्ये आणि प्रेमसंबंधातील सुसंगती याविषयी माहिती देण्यात आली आहे. विविध मूलांकांच्या जोडीदारांशी असलेले संबंध आणि त्यांचे वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम यांचे विश्लेषण या लेखात केले आहे.

Numerology and Marriage : कोणत्या मूलांकाने प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाचा करेक्ट कार्यक्रम होतो; तुमचा मूलांक कोणता?
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 9:13 PM

ज्योतिषशास्त्रात अंक ज्योतिष ही महत्त्वाची शाका आहे. त्याला इंग्रजीत न्यूमेरोलॉजी असं म्हटलं जातं. अंक ज्योतिषात एकूण 9 अंक असतात. या सर्व अंकांचा संबंध ग्रहाशी असतो. ज्या प्रमाणे कुंडलीचे ग्रह नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, तसेच मूलांक आणि भाग्यांकही आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. त्याचा आपल्या प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवानावरही परिणाम होत असतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत.

लांक आणि भाग्यांकाची गणना जन्म तारखेवर आधारीत असते. तुमच्या जन्म तारखेपासून जो सिंगल नंबर मिळतो त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ- तुमची जन्म तारीख 14 असेल तर 1+4 = 5. अशा पद्धतीने 14 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 झाला. भाग्यांकाची गणना तुमच्या संपूर्ण जन्म तिथीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ – तुमची जन्मतिथी 14.4.2001 आहे. या जन्मतिथीची बेरीज केली तर 1+4+4+2+0+0+1 = 12 हा नंबर येतो. आता 12 या नंबरची 1 अधिक 2 अशी बेरीज केली तर 3 नंबर येतो. हा तीन नंबर म्हणजेच तुमचा भाग्यांक आहे.

मूलांक 1

मूलांक 1 असणारे लोक एनर्जेटिक आणि उत्साही असतात. त्यांना सहज प्रभावित करता येत नाही. हे लोक स्वभावाने खूप प्रॅक्टिकल असतात. एखाद्या व्यक्तीला पारखून घेतल्यावर त्याच्याबाबत निर्णय घेतात. अनेक प्रकरणात असं दिसून आलंय की एक मूलांक असलेले लोक लहानपणाच्या मित्रासोबतच लग्न करतात. या मूलांकाच्या लोकांना प्रेम करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. याबाबत कोणताच समझौता होत नाही. या मूलांकाच्या लोकांचे 2, 4 आणि 6 मूलांक असलेले लोक चांगले मित्र होतात. 7, 8 आणि 9 असलेल्यांशी यांचं जमत नाही.

मूलांक 2

मूलांक 2 चे लोक मूडी स्वभावाचे असतात. यांच्यासोबत चांगली मैत्री करण्यासाठी यांच्यासोबत वारंवार बोलावं लागतं. हे लोक सामान्यपणे आपली लव लाइफ दुसऱ्यांशी शेअर करत नाहीत. 1,3,6 अंकाच्या लोकांसोबत यांचं चांगलं कॉम्बिनेशन होतं. पण 5 आणि 8 मूलांक असलेल्यांशी यांचं बिलकूल जमत नाही.

मूलांक 3

मूलांक 3 असलेले लोक अधिक प्रॅक्टिकल आणि आत्मकेंद्री असतात. 3 मूलांक असलेले लोक आपल्या पार्टनरला डॉमिनेट करतात. हे लोक रोमांटिक नसतात. आपल्या मनाचं ऐकून ते प्रेमविवाहाचा निर्णय घेत नाहीत. हे लोक खूप महत्त्वकांक्षी असतात. त्यांना वरच्या पदाची हाव असते. 2, 6, 9 या मूलांक असलेल्यांसोबत त्यांची गट्टी होते, पण 1 आणि 4 मूलांक असलेल्यांशी यांचे संबंध फारसे चांगले नसतात.

मूलांक 4

मूलांक 4 असलेले लोक लग्नानंतरही एकाहून अधिक रिलेशनशीप बनवतात. पण ही गोष्ट 4 मूलांक असलेल्या सर्वच लोकांना लागू होत नाही. 22 तारखेला जन्मलेले बहुतेक लोक आपल्या पार्टनरशी लॉयल असतात. या लोकांचा स्वभाव डॉमेनेटिंग असतो. त्यांचे इतर ठिकाणी बाह्य संबंध असले तरी ते कुणाला कळत नाही. हे लोक अत्यंत रागीट असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही होतो. एवढच नव्हे तर त्यांच्या रागीट स्वभावामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. 1,2,7,8 मूलांक असलेले यांचे चांगले जीवनसाथी असतात, पण यांचे स्वत:चाच अंक म्हणजे 4 मूलांक असलेल्या लोकांशी अजिबात पटत नाही. म्हणजे 4 मूलांक असलेल्या दोन लोकांचं कधीच पटत नाही.

मूलांक 5

5 मूलांक असलेल्या लोकांना फिजिकल रिलेशनशीप अधिक महत्त्वाची वाटते. या बाबत ते अधिक प्रयोगशील असतात. हे लोक कोणत्याही गोष्टीमुळे लगेच बोअर होतात. त्यामुळेच या लोकांचे लग्नापूर्वी असंख्य रिलेशनशीप असतात. हे लोक ठामपणे भूमिका घेऊ शकत नाही. 5 आणि 8 मूलांक असणाऱ्यांशी यांचं चांगलं जमतं. तर 2 मूलांक असलेल्यांशी बिलकूल जमत नाही.

मूलांक 6

6 मूलांक असलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. हे लोक कुणालाही क्षणात इम्प्रेस करतात. हे लोक आपल्या जीवनसाथीशी भावनिकदृष्ट्या अटॅच नसतात. त्यामुळेच लग्नानंतरही त्यांचे रिलेशनशीप असू शकतात. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात क्लेश आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. 6 नंबर हा प्रेम आणि शांती प्रिय नंबर मानला जातो. त्यामुळे यांच्या नात्यात इमोशनल आणि फिजिकल कम्पॅटिबिलिटी असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे यांचं सर्वांशी पटतं. त्यामुळे यांचा कोणताच शत्रू अंक नाही.

मूलांक 7

7 मूलांक असलेले लोक खूप रोमांटिक असतात. या लोकांना आपल्या पार्टनरला रोमांटिक डेटवर घेऊन जाणं आणि त्यांना गिफ्टच्या रुपात सरप्राईज देणं आवडतं. आपल्या पर्सनल लाइफमध्ये यांना खूश राहायचं असतं. करिअरमध्ये यांना प्रगती करायची असते. या लोकांना शांतता आवडते. हे लोक अधिक तणाव सहन करू शकत नाहीत. वैवाहिक जीवन तणावमूक्त ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या पार्टनरशी खुलेपणाने चर्चा करणं आवश्यक आहे. मूलांक 2 असलेले लोक यांचे चांगले पार्टनर ठरतात. पण 9 मूलांक असलेले लोक यांना अजिबात आवडत नाहीत.

मूलांक 8

या मूलांकाचे लोक अधिक मजबूत व्यक्तिमत्ववाले असतात. पण रिलेशनशीपमध्ये हे लोक अधिक इमोशनल असतात. 8 मूलांक असलेले लोक सर्व नंबरच्या लोकांशी लॉयल असतात. अनेकदा गैरसमजामुळे यांना रिलेशनशीपमध्ये त्रस्त व्हावं लागतं. 8 मूलांक असलेल्या महिलांना या समस्या अधिक उद्भवतात. 8 मूलांक असलेल्या व्यक्तीशीच लग्न करणं यांच्यासाठी चांगलं असतं. तर दोन मुलांक असलेल्यांशी यांनी लग्न करू नये. पण 2 मूलांक असलेले यांचे चांगले मित्र होऊ शकतात.

मूलांक 9

9 मूलांक असणारे लोक अधिक डॉमेनेटिंग असतात. हे लोक प्रत्येक गोष्ट हिशोबाने ठेवतात. हे लोक अधिक भावनिक असतात. बरेच लोक यांच्या भावना समजून घेत नाहीत. फिजिकल रिलेशनशीपवर यांचा भर असतो. त्यामुळे हे लोक लग्नानंतरही इतर रिलेशनशीपच्या भानगडीत पडतात. हे लोक कुटुंबाची काळजी घेणारे असतात. 2 आणि 6 अंक यांच्यासाठी परफेक्ट मॅच होतो. तर 1 आणि 9 मूलांक असलेल्यांशी यांचं बिलकूल पटत नाही.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.