Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहणानंतर या नऊ राशीच्या लोकांना घ्यावी लागेल महिनाभर काळजी
काल वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण झाले. जोतिषशास्त्रज्ञांच्या मते याचा परिणाम महिनाभर पाहायला मिळेल.
मुंबई, 8 नोव्हेंबर रोजी भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) पाहायला मिळाले. हे संपूर्ण चंद्रग्रहण होते. जोतिषतज्ज्ञांच्या मते याचा प्रभाव महिनाभर असेल. त्यामुळे काही लोकांना पुढील 30 दिवस काळजी घ्यावी लागेल. विशेषत: मिथुन, वृश्चिक आणि कुंभ वगळता इतर सर्व राशीच्या लोकांनी महिनाभर सावध राहावे लागेल.
- मेष- चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव मेष राशीवर राहणार आहे. या दरम्यान आरोग्याची काळजी घ्या आणि लांबचा प्रवास टाळा. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यावसायिक असाल तर या काळात तुमच्या करिअरमध्ये कोणतीही जोखीम घेणे टाळा.
- वृषभ- राशीच्या ग्रहणामुळे तुमच्या करिअरमध्ये अचानक बदल होऊ शकतो. पुढील एका महिन्यात तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. मानसिक समस्या तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतात. जास्त ताण घेणे टाळा.
- मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ परिणाम देऊ शकते. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरशी संबंधित अडचणी दूर होतील. रोखलेले पैसे मिळतील. येत्या महिनाभरात नफा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- कर्क- करिअरमध्ये मोठे बदल करण्याची वेळ आली आहे. हे चंद्रग्रहण तुमच्या करिअरमध्ये अनेक मोठे बदल घडवून आणू शकते. काही नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही स्थलांतराचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.
- सिंह- तब्येत अचानक बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. या काळात मारामारी, भांडणे, वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारच्या खटल्यापासून दूर राहा.
- कन्या- आरोग्याच्या संबंधित समस्या वाढू शकतात. गंभीर अपघात आणि गंभीर आरोग्य समस्यांपासून दूर राहावे लागेल. करिअरमध्ये बेसावध राहू नका.
- तूळ- तूळ राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात विशेष काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात अनावश्यक शंका, अनावश्यक वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात. पोटाच्या समस्या तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरेल.
- वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांना हे चंद्रग्रहण शुभ परिणाम देऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकते. अचानक यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील.
- धनु- कार्यालयीन ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. कार्यालयातील सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. मुलाच्या बाबतीत चिंता सतावेल.
- मकर- कुटुंबातील वडीलधाऱ्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. नोकरी किंवा करिअरच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका. या काळात कामात अजिबात बेसावध राहू नका.
- कुंभ- कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. ज्या यशाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, ते आता तुम्हाला मिळू शकेल. तुम्हाला संपत्ती आणि धन लाभही मिळू शकतो. उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात.
- मीन- मीन राशीच्या लोकांना ग्रहणानंतर महिनाभर काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही कुठे मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आता थांबा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या समस्या सतावू शकतात.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)