Lunar Eclipse 2023 : या तारखेला लागणार वर्षातले पहिले चंद्रग्रहण, पाच राशींवर घोंघावतेय संकटाचे ढग

चंद्र आपल्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असेल, हे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर देखील बरेच अवलंबून असते. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) शुक्रवार, 5 मे 2023 ला होणार आहे.

Lunar Eclipse 2023 : या तारखेला लागणार वर्षातले पहिले चंद्रग्रहण, पाच राशींवर घोंघावतेय संकटाचे ढग
चंद्रग्रहणImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 9:36 AM

मुंबई : वैदिक शास्त्रांमध्ये चंद्राला मनाचा आणि भावनेचा कारक म्हटले आहे. असे म्हणतात की चंद्राच्या अनुकूलतेमुळे व्यक्तीचा स्वभाव शांत आणि सर्जनशील बनतो. काही कारणाने प्रतिकूल झाले तर माणसाचे जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. चंद्र आपल्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असेल, हे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर देखील बरेच अवलंबून असते. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) शुक्रवार, 5 मे 2023 ला होणार आहे. हे ग्रहण दुपारी 1.34 वाजता होणार असून त्याचा थेट परिणाम 5 राशींवर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी यामुळे प्रभावित होणार आहे.

चंद्रग्रहण 2023 चा या राशींवर होणार परिणाम

कर्क

या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिकदृष्ट्याही तणावात राहाल. कुटुंबात कलह होऊ शकतो. भगवान शंकराची पूजा करून स्वतःला सृजनात्मक कार्यात व्यस्त ठेवल्यास चांगले होईल.

वृषभ

भावंडांशी मतभेद होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबाबत मतभेद वाढू शकतात. इच्छा नसतानाही बाह्य चिंता तुम्हाला घेरतील. या दरम्यान शांती मिळविण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी तुम्ही मंदिरातही जाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

कन्या

नोकरीत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे आयुष्य खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या व्यस्ततेमुळे नातेवाईकांशी तुमचे अंतर वाढू शकते.

मेष

घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तुमचे दिलेले पैसे बुडू शकतात. कायदेशीर वादातही अडकण्याची शक्यता आहे. जीवनात हुशारीने निर्णय घ्या. मानसिक शांततेसाठी उपाय करा.

सिंह

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अशुभ माहिती घेऊन येईल.  कुटुंबासोबत काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे. मन विचलीत राहिल. आरोग्यावर वाईट परिणाम होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.