तूळ राशीतलं चंद्रग्रहण तीन राशींना ठरणार फलदायी, कोणत्या लकी रास आहेत जाणून घ्या

चंद्र आणि सूर्य ग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी त्याचा परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर होतो. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळं भोगावी लागतात. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रीय भाकीत

तूळ राशीतलं चंद्रग्रहण तीन राशींना ठरणार फलदायी, कोणत्या लकी रास आहेत जाणून घ्या
सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर लगेचच चंद्रग्रहणाचा योग, तीन राशींसाठी येणार 'अच्छे दिन'
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 5:20 PM

मुंबई – ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत चंद्र आणि सूर्यग्रहणाचं महत्त्व आहे. ग्रहणाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम दिसून येतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी लागणार आहे. लगेचच 15 दिवसानंतर पहिलं चंद्रग्रहण 5 मे रोजी असणार आहे. हे चंद्रग्रहण तूळ राशीत असणार आहे. तूळ राशीत केतु ग्रह असल्याने चंद्रासोबत असलेल्या युतीमुळे ग्रहण योग जुळून येणार आहे. 5 मे रोजी रात्री 8 वाजून 44 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री उशिरापर्यंत 1 वाजेपर्यंत असेल. छायाकल्प चंद्रग्रहण 4 तास असणार असून सूतक काल मान्य नसेल. मात्र ग्रहणाचा काही राशींवर शुभ अशुभ परिणाम होईल. पण तीन राशींना ग्रहणामुळे धनलाभ आणि प्रगतीचा योग जुळून येईल.

या राशींना होणार चंद्रग्रहण योगाचा फायदा

मिथुन – या राशीच्या जातकांना चंद्र ग्रहण शुभ ठरणार आहे. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. त्याचबरोबर नोकरी करण्याऱ्या जातकांना प्रमोशन आणि इंक्रीमेंट मिळू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. जे लोकं विदेशात जाण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. या काळात तुम्हाला कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच जोडीदार आनंदी असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होईल.

सिंह – या राशीसाठीही छायाकल्प चंद्रग्रहण फलदायी ठरेल. इच्छित मनोकामना पू्र्ण होण्यास मदत होईल. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकेल. या काळात आध्यात्मिक कामात आवड निर्माण होईल. धार्मिक कार्यात पैसे खर्च करण्याची मनापासून इच्छा होईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

मकर – या राशीसाठीही चंद्रग्रहण चांगलं राहील. या काळात अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते. सकारात्मक वातावरणामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. या काळात प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल. तुमच्यास्वभावामुळे काही व्यक्ती आकर्षित होतील. त्यामुळे विचार करूनच एखाद्याला शब्द द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.