Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला असं कराल भगवान शिवाला प्रसन्न, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री येते. मात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी खास असते. महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.

Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला असं कराल भगवान शिवाला प्रसन्न, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
बम बम भोले! महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या यामागचं कारण
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:19 PM

मुंबई: भगवान शिवाचे भक्त मोठ्या आतुरतेने महाशिवरात्रीची (Maha Shivratri 2023) वाट पाहतात. हिंदू पंचांगानुसार वर्षाला 12 शिवरात्री असतात. मात्र माघ महिन्यातील शिवरात्री खास असते म्हणून महाशिवरात्री म्हटलं जातं. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शिवांची मनोभावे पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीला देशभरातील ज्योतिर्लिंग आणि शिवालयात भक्तांची रिघ लागते. मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्री कृष्ण पक्षातील चतुर्दशीला सुरुवात होते. 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी महाशिवरात्रीला सुरुवात होईल. तसेच 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी समाप्ती होईल.

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त

  • निशित काळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत
  • पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटं ते रात्री 09 वाजून 46 मिनिटांपर्यंत
  • द्वितीय प्रहर – रात्री 09 वाजून 46 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत
  • तृतीय प्रहर – 19 फेब्रुवारी, रात्री 12 वाजून 52 मिनिटांपासून 03 वाजून 59 मिनिटांपर्यंत
  • चौथा प्रहर -19 फेब्रुवारी, 03 वाजून 59 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत
  • पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 02 वाजून 40 मिनिटांपर्यंत

महाशिवरात्री पूजा विधी

  • गरुड पुरणानुसार महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच त्रयोदशीला लिंगाची पूजा व्रत संकल्प केला पाहीजे. त्यानंतर चतुर्दशीला उपवास करावा.
  • महाशिवरात्रीला ‘ॐ नमः शिवायः’ मंत्राचा जप करून गंगाजल शिवलिंगावर अर्पण करावं. त्यानंतर रात्रीच्या चार प्रहरात शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे पारण वेळी दान दक्षिणा देऊन समापान करावं.
  • शिवलिंगावर बेलपत्र आणि पांढऱ्या रुईचं फुल अर्पण करावं. शिवपुराणानुसार भगवान शिव यांना रुद्राक्ष, बेलाची पानं, भांग, शिवलिंग आणि काशी अतिप्रिय आहे.
  • ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहेसुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्  ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ या महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा.

पौराणिक कथा

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शंकर लिंगाच्या स्वरुपात प्रकट झाले होते. त्यामुळे या तिथीला शिवाच्या ज्योतिर्लिंग प्रकट रुप म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. शिव पुराणानुसार शंकराचं निराकार रुपाचं प्रतिक असलेलं लिंग या तिथीला प्रकट झालं. या रुपाची सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णुने पूजा केली होती.दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं होतं. भगवान शिवांनी वैराग्य सोडून पार्वतीशी विवाह करत गृहस्थ जीवनात प्रवेश केला होता. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री मोठ्या थाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी शिवभक्त वरात देखील काढतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.