शुक्र-बुध युतीने बनतोय महालक्ष्मी योग: ‘या’ चार राशींना मिळणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर होत असतो. तथापि, या काळात ग्रहांचा एखाद्या राशीवर विशेष प्रभाव असतो, तर काही राशींवर त्याचा कमी प्रभाव पडतो. शुक्र स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध देव आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्र यांच्या […]
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर होत असतो. तथापि, या काळात ग्रहांचा एखाद्या राशीवर विशेष प्रभाव असतो, तर काही राशींवर त्याचा कमी प्रभाव पडतो. शुक्र स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध देव आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने महालक्ष्मी योग (Mahalakshmi yog) तयार होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा विलास, संपत्ती, प्रणय आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानला जातो. दुसरीकडे, बुध ग्रह बुद्धी, तर्क, संवाद आणि कारक मानला जातो. काही राशींना 18 जून रोजी तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगाचा विशेष लाभ होईल. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
- वृश्चिक- या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग शुभ सिद्ध होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन किंवा प्रेम जीवन सुखकर असणार आहे. जीवनात आनंद मिळेल. मित्रांचे आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
- सिंह – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या दहाव्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. तसेच व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
- मेष- या राशीच्या लोकांच्या कुंडलीत दुसऱ्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. कुंडलीचे दुसरे घर धन आणि वाणीचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रोखलेले पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. हा योग अतिशय शुभ सिद्ध होईल.
- कर्क- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या उत्पन्नाच्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात आर्थिक प्रगतीचे योग येतील. तसेच, व्यवसायात मोठी डील निश्चित केली जाऊ शकते. याशिवाय या काळात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)